scorecardresearch

Premium

IPL 2022 KKR vs RR : आज कोलकाता-राजस्थान आमनेसामने, कोणाचा होणार विजय? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरोधातील सामना गमावला होता.

KKR vs RR Playing XI
KKR vs RR Playing XI

IPL 2022 KKR vs RR Playing XI : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४७ वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून ही लढत चंगलीच अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

संजू सॅमसन नेतृत्व करत असलेला राजस्थान रॉयल्स हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने आतापर्यंत ९ सामने खेळले असून यापैकी सहा सामन्यांमध्ये या संघाचा विजय तर तीन सामन्यांमध्ये पराभव झालेला आहे. तर दुसरीकडे कोलकाता संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी या संघाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. या संघाने एकूण नऊ सामन्यांपैकी तीन सामन्यांत विजय मिळवलेला आहे. तर सहा सामन्यांमध्ये कोलकाताचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यासाठी कोलकाता संघ पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

हेही वाचा >> विश्लेषण : उमरान मलिकसारखा १५०च्या वेगानं चेंडू टाकायला काय लागतं?

केकेआरचे अरॉन फिंच आणि व्यंकटेश अय्यर अपेक्षेप्रमाणे खेळताना दिसत नाहीयेत. तर दुसरीकडे आंद्रे रसेलने सुरुवातीच्या काही सामन्यांत उत्तम खेळी केलेली असली तरी त्याने सध्या आपला फॉर्म गमावलेला आहे. गोलंदाजी विभागातील फिरकीपटू सुनिल नरेन आणि वरुण चक्रवर्ती या जोडीने चांगली कामगिरी करुन दाखवलेली नाही. त्यामुळे गोलंदाजी विभागातही या संघाला काम करण्यास संधी आहे. पॅट कमिन्सदेखील चांगली कामगिरी करु न शकल्यामुळे त्याच्याऐवजी टीम साऊदी याला संधी देण्यात आली होती. आजच्या सामन्यात पॅट कमिन्सला संधी दिली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >> आशिया बॅडमिंटन स्पर्धा : अंतिम फेरीत खेळण्याचा हक्क हिरावला! ; प्रतिस्पर्धीला एक गुण बहाल करण्याबाबत सिंधूच्या भावना

तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरोधातील सामना गमावला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात खेळाडूंना मेहनत करावी लागणार आहे. परदेशी खेळाडू डॅरेल मिशेल याचा खेळ राजस्थानसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. त्यामुळे मिशेलऐवजी आता जिमी निशाम किंवा ओबेद मॅक्कॉय याला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थान काय जादू दाखवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा >> SRH vs CSK : उमरान मलिकने टाकला IPL 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू; गायकवाडने ठोकला षटकार, पहा VIDEO

कोलकाता नाइट रायडर्स संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: आरॉन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, बाबा इंद्रजित (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, उमेश यादव, सुनील नरेन, टीम साऊदी, हर्षित राणा

हेही वाचा >> CSK vs SRH : अरेरे…एका धावेनं हुकलं ऋतुराज गायकवाडचं शतक; नटराजनने केले बाद

राजस्थान रॉयल्स संघाचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, डॅरिल मिशेल, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-05-2022 at 15:11 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×