आयपीएल २०२३चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या सामन्यात उत्कृष्ट लयीत होता. त्याने चार षटकांत २९ धावा देत दोन बळी घेतले. यासह त्याने ड्वेन ब्राव्हो आणि लसिथ मलिंगासारख्या अनुभवी गोलंदाजांच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवले. शमी आयपीएलमध्ये १०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अशी कामगिरी करणारा तो १८वा आणि १४वा भारतीय गोलंदाज आहे.

शमीने ९४ आयपीएल सामन्यात १०१ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १५ धावांत तीन बळी. आयपीएलमध्ये, त्याने प्रत्येक २१व्या चेंडूवर एक विकेट घेतली आहे आणि ८.५० च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. या लीगमध्ये तो एक विकेट घेण्यासाठी सरासरी २९ धावा खर्च करतो.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराह वि कोहलीमध्ये जसप्रीतने मारली बाजी, आयपीएलमध्ये पाचव्यांदा केलं विराटला आऊट, पाहा VIDEO
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात डेव्हॉन कॉनवेला बाद करून शमीने ही खास कामगिरी आपल्या नावावर केली. यानंतर त्याने शिवम दुबेलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे, त्याने १६१ सामन्यात १८३ बळी घेतले आहेत. यानंतर श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगाचे नाव येते, ज्याने १२२ सामन्यांत १७० विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज अमित मिश्रा आहे, ज्याने १५४ सामन्यात १६६ विकेट घेतल्या आहेत.

चेन्नईला २०० धावा करता आल्या नाहीत

या सामन्यात गुजरात संघाने तिसर्‍याच षटकात पहिले यश मिळवले. डेव्हॉन कॉनवे सहा चेंडूत केवळ एक धाव काढून बाद झाला. यावेळी चेन्नईची धावसंख्या केवळ १४ धावा होती. यानंतर ऋतुराज गायकवाडने मोईन अलीच्या साथीने डाव सांभाळत वेगवान धावा केल्या. अली १७ चेंडूत २३ धावा करून बाद झाला, पण तोपर्यंत त्याने आपले काम केले होते. यानंतर एका टोकाला विकेट पडत राहिल्या, मात्र गायकवाडने आक्रमकपणे धावा काढल्या. १८व्या षटकात तो बाद झाला, तेव्हा चेन्नईची धावसंख्या १५१ धावा होती. यानंतर शिवम दुबेने १९ आणि धोनीने १७ धावा करत चेन्नईची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात १७८ पर्यंत नेली.

हेही वाचा: IPL 2023: हार्दिक पांड्याच्या गुजरातला मोठा धक्का! केन विल्यमसन आयपीएलमधून बाहेर, दुखापतीमुळे न्यूझीलंडला रवाना

आयपीएलमध्ये १०० विकेट घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज

1. लसिथ मलिंगा ७० सामने

2. भुवनेश्वर कुमार ८१ सामने

3. युझवेंद्र चहल ८३ सामने

4. अमित मिश्रा ८३ सामने

5. आशिष नेहरा ८३ सामने