CSK Players Funny Video With MS Dhoni Viral : आयपीएल २०२३ चा फायनल सामना २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघामध्ये हा फायनलचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. अशातच सीएसकेचा संघ चेन्नईहून अहमदाबादला रवाना झाला आहे. सीएसकेनं पुन्हा एकदा त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गोलंदाज दीपक चहर त्याची पत्नी जयासोबत विमान प्रवास करत असताना पाहायला मिळत आहे. तसंच दीपक कॅप्टन कूल एम एस धोनीचा एक व्हिडीओ काढत असल्याचं धोनीनं पाहिलं आणि त्यानंतर धोनीनं जबरदस्त स्माईल देत चहरचं स्वागत केलं. चहर पत्नीसोबत विमानात बसल्यावर धोनीचा फोटो क्लिक करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

चहर हात मिळवून असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की, तो धोनीचा खूप मोठा चाहता आहे. तर सीएसकेचा कर्णधार धोनी त्याच्या गोलंदाजाच्या या कृत्यावर स्मित हास्य देत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी या व्हिडीओला खूप पसंत केलं आहे. या हंगामात दीपक चहरने अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि ९ सामन्यात १२ विकेट घेण्यात त्याला यश मिळालं आहे. तर दुसरीकडे ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’शो मध्ये दीपकने खुलासा केला आहे की, धोनी नवख्या खेळाडूंसोबत संघाच्या मिटिंगमध्ये किंवा डिनरवेळी जेवण करत असतो.

Hyderabad woman in Jaguar attacks cop over wrong turn row video
जॅग्वार कार उलट्या बाजूनं चालवत पोलिसांवरच आरेरावी; शिवीगाळ करुन…संतापजनक VIDEO व्हायरल
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष
Mohammed Shami's social media post after surgery
Mohammed Shami : ‘बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी…’, शस्त्रक्रियेनंतर शमीने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

नक्की वाचा – सुनील गावसकरांनी हार्दिक पांड्याची केली एम एस धोनीशी तुलना, म्हणाले, “तो संघात ज्या प्रकारे…”

इथे पाहा व्हिडीओ

तसंच धोनीच्या सांगण्यावरून २०१८ मध्ये दीपकची निवड करण्यात आली होती, यावरही त्याने प्रतिक्रिया दिली. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेनं आयपीएलमध्ये चारवेळा जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आहे. जर यावेळी चेन्नई किताब जिंकण्यात यशस्वी झाली, तर सीएसके मुंबई इंडियन्सप्रमामे पाचवेळा आयपीएलची चॅम्पियन टीम ठरेल. दुसरीकडे गुजरातचा संघही सलग दुसऱ्या विजयाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करेल. मागील आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सने राजस्थानचा पराभव करून आयपीएलच्या ट्रॉफीवर जेतेपदाचं नाव कोरलं होतं.