MS Dhoni Tells Team Not To Run Too Much:आयपीएल २०२३ चा हंगाम आतापर्यंत पूर्णपणे महेंद्रसिंग धोनीच्या रंगात रंगलेला दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ जिथेही सामना खेळायला जातो, मग ते राजस्थान असो, कोलकाता असो किंवा इतर कुठलेही शहर असो, स्टेडियममध्ये फक्त माही-माहीचा आवाज ऐकू येतो. विरोधी संघाचे चाहतेही चेन्नई सुपर किंग्जची सात नंबरची जर्सी घालून मैदानावर पोहोचलताना दिसत आहेत. हे सगळे धोनीच्या क्रेझमुळे घडत आहे.

धोनी स्वतः त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते, तेव्हा तो चाहत्यांना विंटेज धोनीची झलक दाखवतो. बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने ९ चेंडूत २० धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. या सामन्यानंतर एमएस धोनीने पत्रकार परिषदेत एक महत्वाचा खुलासा केला. तो म्हणाला, मी संघाला सांगितले आहे की, मला जास्त धावायला लावू नका.

धोनीला जास्त धावायचे नाही –

सामना संपल्यानंतर धोनीने आपल्या खेळीबद्दल सांगितले. तो म्हणाला, “हे माझे काम आहे आणि मी तेच करेन, असे मी संघाला सांगितले आहे. फक्त मला जास्त धावायला लावू नका. ही गोष्ट अजूनही काम करत आहे. माझे योगदान देताना मला आनंद होत आहे.” खरेतर धोनी गुडघेदुखीमुळे खूप त्रस्त आहे. सामन्यानंतर तो अनेकदा लंगडतांना दिसला आहे. विकेट्सच्या दरम्यानही तो पूर्वीसारखा धावत नाही. त्यामुळेच तो फलंदाजी करताना धावण्याऐवजी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा – DC vs CSK: धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने रचला इतिहास; आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणार ठरला पहिलाच संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्याबद्दल बोलताना महेंद्रसिंग धोनी म्हणाला, “दुसऱ्या डावात चेंडू खूप वळत होता. आमच्या फिरकीपटूंचा वेग चांगला आहे, पण त्यांनी हळू गोलंदाजी करावी अशी आमची इच्छा होती. गोलंदाजांनी प्रत्येक चेंडूवर विकेट घेण्याचा विचार करू नये आणि चांगली गोलंदाजी करावी, असे मला वाटते. मला वाटले होते की, १६६-१७० ही चांगली धावसंख्या असेल. फलंदाजी युनिट म्हणून आम्ही अजून चांगली कामगिरी करू शकतो.”