Mumbai Indians vs Gujarat Titans Playing XI Prediction: आयपीएल २०२५ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो सामना असणार आहे. कारण जो संघ हा सामना जिंकेल, तो क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्जचा सामना करणार आहे. तर पराभूत होणारा संघ घरी जाणार आहे. दोन्ही संघांना आपल्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातला चेन्नईकडून एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. तर मुंबईला पंजाबकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे दोन्ही संघ कमबॅक करण्याच्या प्रयत्नात करणार आहेत.

मुंबई इंडियन्सची सलामी जोडी बदलणार?

या महत्वाच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील यष्टीरक्षक आणि सलामीवीर फलंदाज रायन रिकल्टन मायदेशी परतला आहे. यासह विल जॅक्स आणि कॉर्बिन बॉश देखील मायदेशी परतला आहे. महत्वाच्या सामन्यापूर्वी ३ प्रमुख खेळाडू मायदेशी परतल्यामुळे मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे. रायन रिकल्टनच्या जागी इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला संधी दिली जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र, विल जॅक्सची जागा कोण घेणार,हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुंबईकडे बेवोन जेकब्स आणि चरीत असलंका यांचा पर्याय उपलब्ध आहे.

गुजरात टायटन्सची प्लेइंग ११ बदलणार

मुंबई इंडियन्ससह गुजरात टायटन्सला देखील मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज जोस बटलर जोस बटलर इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी वनडे मालिकेसाठी मायदेशी परतला आहे. जोस बटलरची जागा भरून काढणं कठीण आहे. पण, त्याच्या जागी कुसल मेंडिसला संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

गुजरात टायटन्स संघाची संभावित प्लेइंग ११:
शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुसल मेंडिस, शेरफेन रूदरफोर्ड, शाहरुख खान,राहुल तेवतिया, राशिद खान, गेराल्ड कोएत्जे , अर्शद खान, साई किशोर, मोहम्‍मद सिराज.

मुंबई इंडियन्स संघाची संभावित प्लेइंग ११:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्‍टो, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, चरित असलंका, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.