Naveen Ul Haq Takes 4 Wickets Of Mumbai Indians Video Viral : आयपीएल २०२३ चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये होत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई इंडियन्सने २० षटकात ८ विकेट्स गमावत १८२ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे लखनऊला विजयासाठी १८३ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. मुंबईसाठी सलामीला उतरलेल्या ईशान किशन आणि रोहितने मुंबईला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. परंतु, लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने भेदक मारा करून रोहितला ११ धावांवर असताना झेलबाद केला.

त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीनने धडाकेबाज फलंदाजी करून मुंबईची धावसंख्या शंभरी पार केली. मात्र, नवीनने अप्रतिम गोलंदाजी करून या दोन्ही दिग्गज फलंदाजांना बाद केलं आणि धावांचा झंझावात थांबवला. नवीनने तिलक वर्मालाही बाद केलं आणि मुंबईला मोठा धक्का दिला. नवीनच्या जबरदस्त गोलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

pune old memorie
Pune : आठवणीतले पुणे! जुन्या PMT ने तुम्ही कधी प्रवास केला का? VIDEO व्हायरल
Wasim Akram Reacts On Hardik- Rohit Controversy
हार्दिक पंड्याच्या मुलाचा उल्लेख करत वसीम अक्रमने हार्दिक- रोहितबाबत वादावर मांडलं मत; म्हणाला, “२० वर्षांपूर्वी..”
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: डगआऊटमधून रिव्ह्यूसाठी सूचना; टीम डेव्हिडचं ‘ब्रेनफेड मोमेंट’, पाहा VIDEO

इथे पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्ससाठी ईशान किशनने (१५), रोहित शर्मा (११), कॅमरून ग्रीन (४१), सूर्यकुमार यादव (३३), तिलक वर्मा (२६),
टीम डेविड (१३), नेहल वढेरा (२३), ख्रिस जॉर्डन (४), तर ऋतिक शौकीन शून्य धावांवर नाबाद राहिला. लखनऊसाठी नवीन उल हकने चार विकेटस् घेतल्या. यश ठाकूरने तीन विकेट्स घेतल्या, तर मोहसिन खानला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.