Rajasthan Royals vs Mumbai Indians Highlights: राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. गोलंदाजी करताना संघाचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. सोपे झेल सोडले तर साधे चेंडू अडवण्यातही मुंबईचे खेळाडू अपयशी ठरत होते. यादरम्यान कर्णधार पंड्यानेही नवा खेळाडू नुवान तुषाराच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना साधा चेंडू अडवण्यात अपयशी ठरला आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे राजस्थानला चार धावा मिळाल्या. यावर नुवान तुषारा नाराज दिसला पण त्याने फारशी प्रतिक्रिया दिली नाही.

मुंबईने श्रीलंकेचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज नुवान तुषाराने आयपीएलमध्ये पदार्पण केले. जसप्रीत बुमराहने त्याला डेब्यू कॅप दिली. लसिथ मलिंगसारखी स्लिंगिंग ॲक्शन असलेल्या नुवानने ३ षटकांत २८ धावा दिल्या. नुवानचे पहिले षटक चांगले गेले, त्याने फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची एकही संधी दिली नाही. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी एकेरी धाव घेतल्या. पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. यादरम्यान एक प्रसंग आला जेव्हा तो कर्णधार पंड्यावर नाखूश दिसला.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Hardik Pandya Shouted on Jasprit Bumrah Video
IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
Rohit Sharma Yashasvi Jaiswal Emotional Video With Vadalvat Title Song
रोहित शर्मा व यशस्वीचा Video पाहून मराठी प्रेक्षक भावुक; ‘हे’ शब्द ऐकून म्हणाले, “भावा मन जिंकलंस”, तुम्हीही बघा
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Jake Fraser Mcgurk Statement on Jasprit Bumrah
IPL 2024: जेक फ्रेझरचे बुमराहविरूद्धच्या फटकेबाजीवर मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी दिवसभर बुमराहच्या गोलंदाजीचे …’

पदार्पण करणारा तुषारा सामन्यातील सहावे षटक टाकत होता, या षटकातील शेवटचा चेंडू यशस्वी जैस्वालकडे स्ट्राईक होती. यशस्वीने त्याचा चेंडूवर अतिरिक्त कव्हर आणि मिड-ऑफ दरम्यान सुंदर ड्राइव्ह खेळला. तो चेंडू सहज रोखता आला असता, पण कर्णधार हार्दिकने डाईव्ह देऊनही चेंडू रोखू शकला नाही. हे पाहून तुषाराच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. हा चेंडू सीमापार गेला आणि या षटकात तुषाराने एकूण १७ धावा दिल्या.

चेंडू सीमारेषेकडे जाताना पाहून तुषाराच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण खराब क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू कर्णधार असल्याने त्याने जास्त काही प्रतिक्रिया दिली नाही. तो कॅप घालून चेंडूच्या दिशेने पाहत निघून गेला. दुसरीकडे हार्दिकने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि चेहऱ्यावर हलकं हसू आणत चेंडू पकडला.

तत्त्पूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. तिलक आणि नेहलने ९९ धावांची भागीदारी रचली होती. नेहल ४९ धावांवर बाद झाला तर तिलक वर्माने अर्धशतक झळकावले. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने सर्वाधिक ५ विकेट घेतले. प्रत्युत्तरात राजस्थानने केवळ एक गडी गमावून यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकाच्या जोरावर सामना जिंकला. या सामन्यात मुंबई इंडियन्सवर राजस्थानने दबाव कायम ठेवल्याचे दिसले.