IPL 2022 Punjab Kings vs Gujarat Titans Playing 11 Prediction : टाटा आयपीएल २०२२ च्या या हंगामात आज (८ एप्रिल) १६ वा सामना पंजाब किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स असा खेळला जाईल. आयपीएलच्या या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांविरूद्ध लढत आहेत. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल.

पंजाब किंग्ज गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे, तर गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी २ सामन्यात विजय मिळवला. दुसरीकडे गुजरात टायटन्सने आतापर्यंत २ सामने खेळले आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे एकीकडे गुजरातकडून आपली विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे पंजाबचा देखील हा सामना जिंकून गुणतालिकेत स्थान सुधारण्यासाठी प्रयत्न असेल.

पंजाब किंग्जचे संभाव्य प्लेईंग ११ (Punjab Kings Probable XIs) –

मयांक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, ओडेन स्मिथ, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), राहुल चहर, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, वैभव अरोरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : गुजरात-पंजाब यांच्यात आज द्वंद्व

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेइंग ११ (Gujarat Titans Probable XIs) –

हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक) राहुल तेवतिया, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, डेविड मिलर, रशिद खान, वरून अरोन, लोकी फर्गसन, मोहम्मद शमी</p>