Kavya Maran’s reaction viral : आयपीएल २०२४ मधील तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात हैदराबाद संघाला आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाताविरुद्ध ४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात एके काळी हैदराबादचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. कारण त्यांना विजयासाठी शेवटच्या २ चेंडूत ५ धावांची गरज होती. यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनही खूप आनंदी दिसत होती. मात्र हा आनंद खूप काळ टिकला नाही.

शेवटच्या चेंडूवर हैदराबादला बसला पराभवाचा धक्का –

सनरायझर्स हैदराबादला २०९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने १९ षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा केल्या होत्या. आता जिंकण्यासाठी हैदराबाद संघाला सामन्याच्या शेवटच्या ६ चेंडूत १३ धावांची गरज होती, ज्य सहज काढल्या जातील असे वाटले होते. कारण त्यावेळी हेनरिक क्लासेन आणि शाहबाज अहमद क्रीजवर उपस्थित होते. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेनरिक क्लासेनने हर्षित राणाला शानदार षटकार मारला, त्यानंतर हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनच्या आनंदाला पारावार उरला नाही.

सोशल मीडियावर काव्या मारनची रिएक्शन व्हायरल –

आता येथून हैदराबादला विजयासाठी ५ चेंडूत ७ धावांची गरज होती. मात्र, पुढच्या ४ चेंडूत काव्या मारनच्या आनंदाचे दुःखात रूपांतर झाले. हर्षित राणाने पुढच्या चार चेंडूत फक्त २ धावा खर्च केल्या आणि शाहबाज अहमद आणि हेनरिक क्लासेन या दोघांची विकेट घेतली. १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेनरिक क्लासेन बाद झाल्यावर काव्या मारनला खूप दुःख झाले. काव्या मारनच्या आनंदाचे रूपांतर अचानक दुःखात झाले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला हर्षित राणाने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर एकही धाव काढता आली नाही आणि केकेआरने सामना जिंकला. काव्या मारनच्या बदलत्या रिएक्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : ख्रिस गेल, रोहित आणि धोनी यांनाही जे जमलं नाही ते रसेलने केलं, पहिल्याच सामन्यात नोंदवला ‘हा’ खास विक्रम

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन ही सन ग्रुपचे मालक कलानिथी मारन यांची मुलगी आहे. काव्या मारन खूप सुंदर आहे आणि सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. काव्या मारन ही कलानिधी मारन यांची मुलगी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे. काव्या मारन सनरायझर्स हैदराबादची सीएओ आहे. काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट सन एनएक्सटीची प्रमुख आहे. काव्या मारन स्वतः सन म्युझिकशी संबंधित आहेत. एमबीए पूर्ण केल्यानंतर, काव्याने तिचे वडील कलानिधी मारन यांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला होता. काव्याने तिच्या कंपनीत मोठ्या पदावर जाण्यापूर्वी अनुभव मिळविण्यासाठी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिपही केली होती.