RR shared a funny video on the occasion of Rohit Sharma’s birthday: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज ३६ वर्षांचा झाला आहे. आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या रोहितला सगळीकडून अभिनंदनाचे मेसेज येत आहेत. त्याच्या वाढदिवशी रोहित शर्मा वानखेडेवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देणाऱ्या संदेशात, फ्रँचायझीने आपल्या ट्विटर हँडलवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहितसोबत राजस्थान रॉयल्सचे इतर खेळाडू दिसत आहेत.
हा व्हिडिओ शनिवारी सराव सत्रादरम्यान शूट करण्यात आलेला आहे. त्यानंतर या व्हिडिओसोबत बॅकग्राउंडमध्ये वेगवेगळे आवाज जोडून तो मजेदार बनवला. व्हिडिओमध्ये, चहल प्रथम रोहित शर्माकडे जाताना दिसत आहे आणि “हॅपी बर्थडे रोहित भैया आणि कसे आहात ?” प्रत्युत्तरात रोहित म्हणतो,”तू पार्टी मागायला आला आहेस. रोहित शर्मा पार्टी देण्यास नकार देतो आणि म्हणतो, कसलीही पार्टी होणार नाही. तू माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर केक लावतो. त्यावर चहल म्हणतो, तर काय झालं भैया, हे तर आमचे प्रेम आहे.”
मजेदार व्हिडिओमध्ये ‘या’ खेळाडूंचाही आहे समावेश –
रोहित आणि युजवेंद्र चहल व्यतिरिक्त जोस बटलर, जोफ्रा आर्चर, क्रिस जॉर्डन, कुमार संगकारा आणि किरॉन पोलार्ड देखील या मजेदार व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, जोस बटलर आणि कुमार संगकारा तक्रार करतात की त्यांना वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण मिळाले नाही. यावर किरॉन पोलार्ड म्हणतो की, ‘ते येईल, थोडा धीर धरा.’ व्हिडिओमध्ये ट्रेंट बोल्ट देखील एंट्री करतो, ‘तो चहलला विचारतो की आज पार्टीमध्ये कोण गाणार?’ व्हिडिओच्या शेवटी सचिन तेंडुलकर आणि लसिथ मलिंगा देखील दिसत आहेत.
हेही वाचा – IPL 2023: अंबाती रायडूने त्याचे ट्विट सुनील गावसकरांच्या विधानाशी जोडल्याने व्यक्त केली नाराजी, म्हणाला…
राजस्थान रॉयल्सने गेल्या सामन्यात सीएसकेचा पराभव केला –
आयपीएल २०२३ च्या ४२ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने असणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या मोसमात चांगल्या लयीत दिसत आहे. राजस्थानने गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे. राजस्थानचा संघ सध्या ५ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स ७ पैकी ३ सामने जिंकून ९व्या स्थानावर आहे.