IPL 2022, RCB vs SRH Match: टाटा इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ३६ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध लढताना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) संपूर्ण संघ केवळ ६८ धावांमध्ये गारद झाला. विशेष म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील एक लाजिरवाणा विक्रमही आरसीबीच्याच नावावर आहे. हा विक्रम आहे निचांकी धावसंख्या करण्याचा.

आरसीबीचा (RCB) संघ याआधी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध केवळ ४९ धावांवर भुईसपाट झाला होता. ४९ धावसंख्येसह निचांकी धावसंख्या करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबी पहिल्या क्रमांकावर आहे.

आयपीएलच्या इतिहासातील निचांकी धावसंख्या करणारे पहिले १० संघ

१. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ४९ धावा (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध)
२. राजस्थान रॉयल्स – ५८ धावा (राजस्थान चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध)
३. दिल्ली कॅपिटल्स – ६६ धावा ( मुंबई इंडियन्स विरुद्ध)
४. दिल्ली कॅपिटल्स – ६७ धावा (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध)
५. कोलकाता नाईट रायडर्स – ६७ धावा (मुंबई इंडियन्स विरुद्ध)
६. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ७० धावा (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध)
७. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ७० धावा (राजस्थान रॉयल्स विरुद्ध)
८. किंग्ज इलेव्हन पंजाब – ७३ धावा (पुणे सुपरजायंट्स विरुद्ध)
९. कोची टस्कर्स केरळ – ७४ धावा (डेक्कन चार्जर्स विरुद्ध)
१०. चेन्नई सुपर किंग्ज – ७९ धावा (मुंबई इंडियन्स विरुद्ध)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इनिंग

बंगळुरूकडून सुयश प्रभुदेसाईने २० चेंडूत १५ धावा केल्या. यात त्याच्या एका चौकाराचा समावेश आहे. या सामन्यात १५ ही बंगळुरूच्या फलंदाजांपैकी सर्वाधिक धावसंख्या ठरली. यानंतर ग्लेन मॅक्सवेलचा क्रमांक येतो. त्याने ११ चेंडूत १२ धावा केल्या. त्यात मॅक्सवेलच्या २ चौकारांचा समावेश आहे. बंगळुरूच्या संघात प्रभुदेसाई आणि मॅक्सवेललाच दोन अंकी धावा काढता आल्या. इतर सर्व खेळाडू एकअंकी धावा काढत बाद झाले.

हेही वाचा : IPL 2022, RCB vs SRH Match Result : हैदराबादचा बंगळुरूवर ९ विकेटने मोठा विजय

कर्णधार डु प्लेसिस ५ धावा (७ चेंडू), अनुज रावत ० धावा (२ चेंडू), विराट कोहली ० धावा (१ चेंडू), शाहबाज अहमद ७ धावा (१२ चेंडू), दिनेश कार्तिक ० धावा (३ चेंडू), हर्षल पटेल ४ धावा (८ चेंडू), वानिंदु हसरंगा ८ धावा (१९ चेंडू) आणि मोहम्मद सिराज २ धावा (४ चेंडू) करून बाद झाले. जोश हेजलवुड ११ चेंडूत ३ धावा करून नाबाद राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनरायजर्स हैदराबाद इनिंग

बंगळुरूकडून मिळालेल्या ६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि कर्णधार केन विलियमसनने सलामी खेळी केली. यावेळी अभिषेकने २८ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने दमदार ४७ धावांची खेळी केली. केन विलियमसनने १७ चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. यात त्याच्या २ चौकारांचा समावेश आहे. राहुल त्रिपाठीने ३ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या. यात त्याच्या एका षटकाराचा समावेश आहे.