रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर यंदाच्या आयपीएल २०२५च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आरसीबीने पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत केलं. आरसीबीने २ विकेट्स गमावत अवघ्या १० षटकांत पंजाब किंग्सने दिलेलं १०२ धावांचं लक्ष्य गाठलं. यादरम्यान फिल सॉल्टला जलद शतक झळकावत संघाला विजयाकडे नेलं. तर रजत पाटीदार विनिंग षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यासह आरसीबीचा संघ चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत.
पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीने पंजाबला एकतर्फी सामन्यात पराभूत केला. जोश हेझलवूड, सुयश शर्मा आणि फिल सॉल्ट हे बेंगळुरूच्या विजयाचे हिरो ठरले. हेझलवूड आणि सुयश यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. आरसीबी २०१६ नंतर ९ वर्षांनी अंतिम फेरीत पोहोचली आहे.
आयपीएलच्या प्लेऑफ इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने इतका मोठा विजय मिळवला आहे. आरसीबीने पहिला क्वालिफायर सामना फक्त १० षटकांत जिंकला. चेंडूंच्या बाबतीत प्लेऑफमधील कोणत्याही संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे.
आरसीबीने आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. या संघाने ६० चेंडू बाकी ठेवत सामना जिंकला. गेल्या वर्षी केकेआरने चेन्नईला ५७ चेंडू शिल्लक ठेवत हरवलं होतं. यापूर्वी, केकेआरने सनरायझर्स हैदराबादला ३८ चेंडू बाकी असताना हरवलं. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ फक्त ८४ चेंडूतच सर्वबाद झाला आणि त्यांना फक्त १०१ धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल, फिल सॉल्टच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने सामना सहज जिंकला. सॉल्टने २७ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या.
आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. पंजाब किंग्सचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला. पंजाबचा फलंदाजी क्रम पत्त्यांसारखा कोसळला आणि संघ १४.१ षटकांत सर्वबाद झाला. पंजाबने १४ षटकांत फक्त १०१ धावा करू शकला. पंजाबकडून प्रियांश आर्य ७, प्रभसिमरन सिंग १८ धावा, इंग्लिस ४, श्रेयस अय्यर २ तर नेहाल वधेरा ८ धावा करत स्वस्तात बाद झाला. यानंतर स्टॉयनिसने सर्वाधिक २६ धावा बाद झाला. यानंतर अजमतुल्लाने १८ धावा केल्या.
पंजाबने दिलेल्या १०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट २७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावा करत नाबाद परतला. तर विराट कोहली १२ चेंडूत १२ धावा करत बाद झाला. मयंक अग्रवाल १३ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १९ धावा करत बाद झाला. तर रजत पाटीदार ८ चेंडूत १ चौकार १ षटकारासह १५ धावा करत नाबाद परतला.