आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती अटीतटीच्या होत आहेत. सर्वच संघ तुल्यबळ असल्यामुळे सामन्यात कोणाचा विजय होईल हे सांगणे अवघड झाले आहे. दरम्यान आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये या हंगामातील ३१ वी लढत होत आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघ विजयासाठी पूर्ण ताकतीने लढणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार फॅफ डू प्लेसिससाठी तर ही लढत विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा >>> Shreyas Iyer : केकेआरच्या श्रेयस अय्यरवर तरुणी फिदा, हातात पोस्टर घेत विचारते लग्न करशील का ?

फॅफ डू प्लेसिससाठी ही लढत महत्त्वाची का आहे ?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यापैकी चार सामन्यांत बंगळुरुचा विजय झालेला आहे. तर दोन सामने गमवावे लागले आहेत. दोन पराभव आणि चार विजयामुळे आरसीबी संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यासाठी आरसीबी संघ पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे. तसेच बंगळुरुचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसचा आजचा आयपीएलमधील १०० वा सामना असेल. आज मैदानात उतरताच आयपीएलमध्ये तो सामन्यांचे शतक करणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय संपादन करणे फॅफ डू प्लेसिससाठी फार महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा >>> PBKS VS DC : करोनामुळे दिल्ली-पंजाब यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलले, आता मुंबईत लढत रंगणार

हेही वाचा >>> RR vs KKR : पती युजवेंद्र चहलच्या हॅटट्रिकनंतर पत्नी धनश्रीचं भन्नाट सेलिब्रेशन, प्रेक्षक गॅलरीतील व्हिडीओ व्हायरल

लखनऊ सुपर जायंट्सदेखील फॉर्ममध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बंगळुरुशी आज दोन हात करणारा लखनऊ सुपर जायंट्स हा संघदेखील या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. लखनऊ संघाने एकूण सहा सामने खेळले असून यापैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यांमध्ये लखनऊचा पराभव झालेला आहे. हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.