Virat Kohli Record For RCB: लखनऊच्या एकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने २० षटकांअखेर २३१ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विराट कोहली आणि फिल सॉल्टने दमदार सुरूवात करून दिली. यादरम्यान विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहलीचे ८०० चौकार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील सर्वात विश्वासू फलंदाज विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराट कोहली एकाच संघाकडून ८०० चौकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने या डावात २५ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारला.
आरसीबीसाठी असा रेकॉर्ड करणारा विराट पहिलाच फलंदाज
विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी खेळत आहे. यादरम्यान त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी सर्वाधिक चौकार मारण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. विराट कोहलीने या संघासाठी आतापर्यंत २६४ सामने खेळले आहेत. यादरम्यान विराट कोहलीने ८०० चौकार खेचले आहेत. या यादीत जेम्स विंस दुसऱ्या स्थानी आहे. त्याने हॅम्पशायर संघासाठी खेळताना ६९४ चौकार खेचले आहेत. तर अॅलेक्स हेल्सने नॉटिंगहॅमशायर संघासाठी खेळताना ५६३ चौकार मारले आहेत. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी ५५० चौकार मारले आहेत. तर ल्यूक राईटने ससेक्स संघासाठी ५२९ चौकार मारले आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
८०० – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी)*
६९४ – जेम्स विंस (हॅम्पशायरसाठी)
५६३ – अॅलेक्स हेल्स (नॉटिंगहॅमशायरसाठी)
५५० – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्ससाठी)
५२९ – ल्यूक राईट (ससेक्ससाठी)
विराट कोहलीची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी
विराट कोहलीच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरी बद्दल बोलायचं झालं, तर त्याला या संघाकडून २६४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ८५५२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ८ शतकं आणि ६२ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान नाबाद ११३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.