आयपीएलच्या पंधरावा हंगाम आता शेवटाकडे मार्गक्रमण करतोय. प्लेऑफर्यंत कोण पोहोचणार हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. मात्र सध्या सर्वात चर्चा आहे ती म्हणजे बंगळुरु संघाची. या संघातील स्टार फलंदाज विराट कोहली यावेळी खराब खेळी करताना दिसतोय. या संघाने आठ मे रोजीच्या सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी परिधान केली होती. या सामन्यात बंगळुरु संघाने हैदराबादला धूळ चारत दणदणीत विजय नोंदवला होता. याआधीही या संघाने हिरव्या रंगाची जर्सी परिधान केली होती. हिरव्या रंगाची जर्सी आणि बंंगळुरु संघ यांच्यात खास कनेक्शन आहे.
हेही वाचा >> ग्रेट कॅप्टन कूल! धोनीने ८ चेंडूंत २१ धावा करत रचला नवा विक्रम, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान
आरसीबीच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये वर्षे २०११ ते २०२१ अशा एकूण दहा वेळा हिरव्या रंगाची जर्सी परिधान केलेली आहे. मात्र हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. आयपीएल २०११ आणि आयपीएल २०१६ अशा फक्त दोनच हंगामामध्ये या संघाला हिरव्या रंगाची जर्सी परिधान करुन सामना जिंकता आलेला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही वेळा बंगळुरु संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती.
हेही वाचा >> IPL 2022 : बॅटिंगला जाण्यापूर्वी धोनी का खातो आपली बॅट? सह खेळाडूने केला खुलासा
आयपीएल २०२२ मध्ये विजय
म्हणजेच बंगळुरुने जेव्हा-जेव्हा हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये विजय मिळवलेला आहे, तेव्हा या संघाने फायलनपर्यंत मजल मारलेली आहे. आयपीएलच्या या हंगामातही बंगळुरुने ५४ व्या सामन्यात हैदराबादविरोधात खेळताना हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये विजय मिळवलाय. त्यामुळे यावेळी बंगळुरु संघ फायनलपर्यंत मजल मारणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा >> दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून विराट कोहली झाला थक्क, ‘डीके दादा’ला केलं थेट नमन, पाहा व्हिडीओ
आरसीबी संघ ग्रीन जर्सी का परिधान करतो?
आरसीबी संघ प्रत्येक हंगामात हिरव्या रंगाची जर्सी परिधान करुन निसर्ग म्हणजेच पर्यावरण आणि पृथ्वीच्या संरक्षणाचा संदेश देतो. २०२१ साली आरसीबीने कोरोना वॉरियर्सना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती.