Naveen Ul Haq’s reply to Kohli-Kohli Chanting: आयपीएल २०२३ मध्ये, विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यात लीग सामन्यादरम्यान जोरदार वादावादी झाली होती. त्यानंतर लखनऊचा गोलंदाज ज्या-ज्या मैदानावर खेळला, तिथे कोहलीचे चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांनी प्रत्येकवेळी कोहली-कोहलीच्या घोषणा देत नवीनला चिडवत राहिले. यावर आता नवीन उल हकने स्वता: प्रतिक्रिया दिली आहे.

क्रृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला, परंतु मुंबईने एलिमिनेटर सामन्यात या संघाचा ८१ धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठण्याचे या संघाचे स्वप्न भंगले. नवीन-उल-हकने चेपॉकमध्ये मुंबईविरुद्ध चांगली गोलंदाजी करत ४ षटकांत ३८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. चेपॉकमध्येही स्टेडियममध्ये कोहली-कोहलीच्या नावाच्या घोषणा ऐकू येत होत्या. तेव्हा नवीन विकेट घेतल्यानंतर कानात बोटं घालतं होता आणि जुमानत नसल्याचे संकेत देत होता.

स्टेडियममध्ये कोहली-कोहलीच्या गोंगाटाबद्दल बोलताना नवीन-उल-हकने सामन्यानंतर सांगितले की, “मला मजा येते (कोहली-कोहलीच्या नावाचा जप). मला आवडते की मैदानावरील प्रत्येकजण त्याच्या (विराट कोहली) किंवा इतर कोणत्याही खेळाडूच्या नावाचा जप करत आहे. यामुळे मला माझ्या संघासाठी अधिक चांगले खेळण्याची प्रेरणा मिळते.”

हेही वाचा – IPL 2023: सूर्यकुमार यादवने झोपलेल्या तिलक वर्माची घेतली मजा, मुंबई इंडियन्सने शेअर केला मजेशीर VIDEO

लखनौ सुपरजायंट्सचे मार्गदर्शक गौतम गंभीरबद्दल बोलताना नवीन-उल-हक म्हणाला की, “तो भारतीय क्रिकेटचा एक दिग्गज आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे आणि भारतात त्याचा खूप आदर आहे. एक मार्गदर्शक आणि क्रिकेटचा दिग्गज म्हणून मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.” अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने या हंगामात लखनऊसाठी ८ सामने खेळले, ज्यात त्याने ११ विकेट घेतल्या. या मोसमात त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ३८ धावांत ४ बळी ही त्याने मुंबईविरुद्ध केली.

हेही वाचा – IPL 2023: “माही भाई बॅटिंगला येत असताना…”; आकाश मधवालने सांगितला एमएस धोनीला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा अनुभव

लखनऊ आणि मुंबईच्या एलिमिनेटर सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर लखनऊला विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १६.३ षटकांत १०१ धावांत गारद झाला.