दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतच्या एका चुकीच्या निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पंतने योग्य वेळी डीआरएस घेतला असता तर मुंबईचा फलंदाज टीम डेव्हिड बाद झाला असता. परिणामी दिल्लीला विजयापर्यंत पोहोचता आले असते, अस दिल्लीचे चाहते म्हणत आहेत. मात्र पंधराव्या षटकादरम्यान संधी असूनही पंतने डीआरएस घेतला नाही, याबद्दल ऋषभ पंतने स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा >>> ऋषभ पंतने न घेतलेला रिव्ह्यू महागात; मुंबई विजयी, दिल्ली प्लेऑफच्या बाहेर

“चेंडूचा बॅटला स्पर्श झाल्याची शंका मला वाटली होती. मी अन्य खेळाडूंशी वार्तालाप केला होता. मात्र या खेळाडूंना पुरेशी खात्री नव्हती. डीआरएस घ्यावा का असे मी त्यांना विचारत होतो. मात्र इतर खेळाडूंना खात्री नसल्यामुळे मी डीआरएस घेतला नाही,” असे ऋषभ पंतने स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा >>> सामना मुंबई-दिल्लीचा, पण बंगळुरुला लाभ; ‘पलटण’च्या विजयामुळे विराटचा संघ थेट प्लेऑफमध्ये

दरम्यान, दिल्लीने मुंबईसमोर विजयासमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली आणि दिल्लीचे प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचे स्पप्न अधुरे राहिले. मुंबईच्या विजयासाठी टीम डेव्हिडने मोलाची कामगिरी केली. त्याने ११ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. दिल्ली संघाकडे टीम डेव्हिडला बाद करण्याची संधी चालून आली होती. मात्र ऋषभ पंतने ऐन वेळी डीआरएस घेतला नाही.

हेही वाचा >>> पृथ्वी शॉ चांगलाच गोंधळला, जसप्रितच्या बाऊन्सरचा सामना करताना थेट खाली कोसळला; झाला झेलबाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंधराव्या षटकात शार्दुल ठाकुरने टाकलेला चेंडू टीम डेव्हिडीच्या बॅटची किनार घेत ऋषभ पंतच्या हातात विसावला होता. मात्र खात्री नसल्यामुळे ऋषभ पंत तसेच शार्दुल ठाकुर दोघे गोंधळले. त्यानंतर चेंडू बॅटला लागला नसल्याचे समजत ऋषभने डीआरएस घेतला नाही. मात्र रिव्ह्यूमध्ये बॅट आणि चेंडू यांचा संपर्क झाल्याचे दिसले. या ठिकाणी पंतने डीआरएस घेतला असता तर टीम डेव्हिड बाद झाला असता. एकदा जीवदान मिळाल्यानंतर टीम डेव्हिड दिल्ली संघासाठी चांगलाच महागात पडला. त्याने अवघ्या ११ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला विजय सोपा झाला.