Royal Challengers Banglore vs Delhi Capitals Score Updates : बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विराट कोहलीने आजच्या सामन्यातही दमदार शतक ठोकलं. विराटने ३४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावा कुटल्या. परंतु ललिल यादवच्या गोलंदाजीवर कोहली बाद झाला आणि आरसीबीला मोठा धक्का बसला. कर्णधार फाफ डु प्लेसिसने या सामन्यात २२ धावांची खेळी केली. दरम्यान, आरसीबीने २० षटकांत ६ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी २० षटकांत १७५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

आरसीबीसाठी माहिपाल लोमरोरने १८ चेंडूत २६ धावा केल्या. दिल्लीचा वेगवाना गोलंदाज मिचेल मार्शने माहिपालला २६ धावांवर पॅव्हेलिनयचा रस्ता दाखवला. त्यानंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेल २४ धावांवर झेलबाद झाला. आरसीबीच्या धावसंख्येची गती मंदावली असतानाच कुलदीप यादवने भेदक मारा करून आरसीबीच्या समस्येत वाढ निर्माण केली. कुलदीपने एकाच षटकात दोन विकेट्स घेऊन आरसीबीच्या फलंदाजीचा गड ढासळला.

कुलदीपने मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकला बाद केल्यानं दिल्ली कॅपिटल्सला आरसीबीची धावसंख्या रोखता आली. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने आणि मिचेल मार्शने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि ललित यादवला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. आरसीबीचा फलंदाज शाहबाज अहमद २० तर अनुज रावत १५ धावांवर नाबाद राहिला.