Royals Challengers Bangalore vs Punjab Kings Latest Score Updates : मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये आयपीएलचा २७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. विराट-फाफच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांची आरसीबीच्या गोलंदाजांनी पुरती दाणादाण केली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाबच्या चार फलंदाजांना बाद करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेलं. त्यामुळे पंजाबचा आख्खा संघ १५० धावांवर गारद झाला आणि आरसीबीचा या सामन्यात २४ धावांनी विजय झाला.

सलामीला मैदानात उतरलेला अथर्व तायडे स्वस्तात माघारी परतला. मोहम्मद सिराजने ४ धावांवर असताना अथर्वला बाद केलं. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने सावध खेळी करत ३० चेंडूत ४६ धावांची खेळी साकारली. परंतु त्यालाही पार्नेलने क्लीन बोल्ड केलं अन् पंजाबला दुसरा धक्का बसला. मॅथ्यू शॉर्ट आणि लियाम लिविंगस्टनलाही धावांचा सूर गवसला नाही. हरप्रीत सिंग भाटीया आणि सॅम करनही स्वस्तात माघारी परतले. परंतु, पंजाब किंग्जचा विकेटकीपर जितेश शर्माने आक्रमक खेळी केली. आरसीबीसाठी मोहम्मद सिराजने ४ विकेट घेतल्या. हसरंगालाही दोन विकेट घेण्यात यश मिळालं. तर पार्नेलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबकडून फिरकीपटू राहुल चाहरने चार षटकांत २४ धावा दिल्या. पण राहुलला एकही विकेट मिळवण्यात यश आलं नाही. सॅम करनच्या गोलंदाजीवर फाफ ६८ धावांवर खेळत असताना उंच झेल उडाला होता. परंतु, पंजाबचा विकेटकीपर जितेश शर्माने झेल सोडला आणि फाफला जीवदान मिळालं. त्यानंतर हरप्रीत बरारच्या गोलंदाजीवर आरसीबीला पहिला धक्का बसला. विराट कोहली ५९ धावा करून बाद झाला. विराटने ४७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार ठोकून ५९ धावांची खेळी साकारली.