Yuzvendra Chahal who played 150 IPL Matches Complete : युझवेंद्र चहल २०१३ पासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत असून या लीगच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे. आयपीएल २०२४ मध्ये, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे, जो युझवेंद्र चहलच्या आयपीएल कारकिर्दीतील १५० वा सामना आहे. या खास कामगिरीसाठी त्याची पत्नी धनश्री वर्माने व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या लाइफ पार्टनरला खास संदेश दिला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांनी युजींचे अभिनंदन केले आणि सर्वांना त्यांचा अभिमान असल्याचे सांगितले.

धनश्री वर्माने युजवेंद्रला दिल्या खास शुभेच्छा –

धनश्री वर्माने गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी आपल्या पतीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर खास शैलीत शुभेच्छा दिल्या. ती म्हणाली, “युजी, तुला आयपीएल कारकिर्दीतील १५० वा सामना खेळण्यासाठी तुमचे खूप खूप शुभेच्छा. मी हे आधीही सांगितले आहे आणि आजही तेच म्हणेन, अभिनंदन आणि आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे. तुझ्या कारकिर्दीत तू इतर संघांचे आणि आता राजस्थान रॉयल्सचे नाव उंचावले आहेस.”

Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज
List of Mahendra Singh Dhoni's records
DC vs CSK : माहीने दिल्लीविरुद्ध दमदार फटकेबाजी करत लावली विक्रमांची रांग, पाहा संपूर्ण यादी
MS Dhoni 300 Dismissals in T20
DC vs CSK : महेंद्रसिंग धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला यष्टीरक्षक

धनश्री वर्मा पुढे म्हणाली, “प्रत्येक वेळी तू उत्कृष्ट शैलीने पुनरागमन केले आहेस, ज्यासाठी आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू असा गोलंदाज आहेस, जो दबावातही संघाला विकेट मिळवून देतो. तब स्वतःवर विश्वास ठेव आणि आम्ही सर्व तुला साथ देत राहू. मी तुझी सर्वात मोठी चीअरलीडर आहे. तुझ्या १५० व्या सामन्याचा आनंद घे आणि हल्ला बोल.”

हेही वाचा – IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट

युजवेंद्र चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज –

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात युजवेंद्र चहल हा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध सामना सुरू होण्यापूर्वी त्याने १४९ सामन्यांमध्ये १९५ विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत ड्वेन ब्राव्हो १८३ विकेट्सह दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. चहलचा सध्याचा फॉर्म पाहता तो लवकरच आयपीएलच्या इतिहासात २०० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरणार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

राजस्थानने गुजरातला दिले धावांचे लक्ष्य –

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रियान पराग आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ३ बाद १९६ धावा केल्या. त्याचबरोबर आता गुजरात टायटन्ससमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थान रॉयल्सकडून रियान पराहगने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७८ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर कर्णधार संजू सॅमसनने ३८ चेंडूचा सामना करताना ७ चौकार आणि २ षचकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर गुजरातकडून उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.