Sachin Tendulkar Reaction On Arjun Tendulkar Wicket: हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला बाद करून आयपीएलच्या पहिल्या विकेटवर शिक्कामोर्तब केलं. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १४ धावांनी विजय मिळवला. सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत मुंबई इंडियन्सचं अभिनंदन केलं. सचिनने ट्वीटमध्ये अर्जुन तेंडुलकरचाही उल्लेख केला. सचिनने ट्वीटच्या माध्यमातून कॅमरून ग्रीन, ईशान किशन आणि तिलक वर्माला शुभेच्छा दिल्या. ट्वीटमध्ये तेंडुलकरने म्हटलं, मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अप्रतिम अष्टपैलू प्रदर्शन केलं. कॅमरून ग्रीनने फलंदाजी आणि गोलंदाजीतून प्रभावीत केलं. इशान आणि तिलकची फलंदाजी जबरदस्त आहे. दिवसेंदिवस आयपीएलचे सामने रोमांचक होत आहेत. खूप चांगले खेळले….अखेर तेंडुलकरकडे आयपीएल विकेट आहे.

रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला शेवटचं षटक दिलं. त्यावेळी हैद्राबादला २० धावांची आवश्यकता होती. पण अर्जुनने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत सटीक यॉर्कर फेकले आणि मुंबई इंडियन्सने हैद्राबादवर १४ धावांनी विजय मिळवला. अर्जुनने शेवटच्या षटकात ५ धावा दिल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित केलं. कॅमरून ग्रीनने फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देऊन अष्टपैलू कामगिरी केली.

नक्की वाचा – बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडून क्रीडाविश्वात उडवली खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रीनने ४० चेंडूत ६४ धावांची नाबाद खेळी केली. तर ४ षटकांत २९ धावा देत १ विकेट घेण्याची कामगिरी केली. सामन्यात ग्रीनने (४० चेंडूत नाबाद ६४ धावा) आणि तिलक वर्मा (१७ चेंडूत ३७ धावा) केल्या. या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पाच विकेट्स गमावत १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैद्राबादला २० षटकांत १७८ धावा करता आल्याने त्यांचा पराभव झाला. मुंबईने सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला.