Shaik Rasheed Takes Outstanding Catch Video : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ४१ वा सामना रंगतदार झाला. चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाबने बाजी मारली. चेन्नईने दिलेलं २०१ धावांचं लक्ष्य गाठताना पंजाबच्या फलंदाजांची दमछाक झाली. परंतु शेवटच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना सिकंदर रजाने पंजाबला विजय मिळवून दिला. मात्र तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर पंजाबचा धडाकेबाज फलंदाज लियाम लिविंगस्टोन ४० धावांवर झेलबाद झाला. पण हा साधारण झेल नव्हता. कारण शेख रशीदने आकाशात उंच उडालेल्या चेंडूची झेल घेतलीच पण काही मीटर अंतरावर असलेल्या सीमारेषेला पायाचा स्पर्शही होऊ दिला नाही. रशीदने शरीराचा जबरदस्त तोल सावरून हा झेल घेतला आणि आख्ख्या स्टेडियममध्ये सर्वांच्याच भुवया उंचावल्या. रशिदच्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

धडाकेबाज फलंदाज लियाम लिविंगस्टोनने पंजाब किंग्जला विजयाच्या दिशेन नेलं होतं. परंतु, तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर लियाम बाद झाला आणि सामन्यात नवा ट्वीस्ट आला. लियामच्या विकेटनंतर चेन्नईच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, जितेश शर्मा आणि सिकंदर रजाने शेवटच्या षटकात अप्रतिम फलंदाजी करून चेन्नईच्या आशेवर पाणी फेरलं. असं असतानाही शेख रशीदच्या त्या झेलची क्रीडा विश्वात तुफान चर्चा रंगलीय. कारण आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ठ झेल म्हणून याकडे पाहिलं जात आहे.

नक्की वाचा – कुणालाच जमलं नाही पण ‘या’ खेळाडूने करून दाखवलं, जमिनीवर झोपून चौकार ठोकला, ‘त्या’ शॉटचा Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाडने ३७ धावा केल्या. डेवॉन कॉन्वेनं चौफेर फटकेबाजी करत ५२ चेंडूत ९२ धावांची नाबाद खेळी केली. तसंच शिवम दुबेनं २८ धावांची खेळी साकारली. कर्णधार धोनीनं शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकून सामन्याच रोमांच अधिक वाढवला. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंगने (४२), शिखर धवन (२८), लियाम लिविंगस्टोन (४०), सॅम करन (२९), जितेश शर्माने २१ धावा केल्या. तर सिकंदर रजा १३ धावांवर नाबाद राहिला.