Shubman Gill Instagram Story on Rift Between Him & Hardik Pandya: मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सचा संघ विजयासह क्वालिफायर-२ साठी पात्र ठरला. तर गुजरातचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मुंबईच्या विजयाबरोबरच या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये बिनसलं असल्याची चर्चा सुरू होती. ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यावर आता शुबमन गिलने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत उत्तर दिलं आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने हार्दिक पंड्याबरोबरच्या मतभेदाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यादरम्यान गिल आणि मुंबई इंडियन्सच्या कर्णधारामध्ये काही घटनांमुळे सोशल मीडियावर अफवा पसरल्या की दोघांमध्ये काहीतरी वाद सुरू आहे.
हार्दिक-गिलमध्ये वाद असल्याच्या चर्चेला सुरूवात नाणेफेकीपासून झाली. नाणेफेकीदरम्यान हार्दिकने नाणेफेक जिंकल्यांतर गिलने हात मिळवण्यास नकार दिला होता. ज्याचा व्हीडिओ समोर आला. यानंतर गुजरातच्या डावामध्ये गिल बाद झाल्यानंतर हार्दिकच्या सेलिब्रेशननेही लक्ष वेधून घेतलं.
शुबमन गिलने आता या चर्चांवर पूर्णविराम लावत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शुबमनने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने हार्दिक पंड्याबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातला एक फोटो आयपीएलदरम्यान नाणेपेकीवेळेचा आहे. तर दुसरा फोटो भारतीय संघाच्या जर्सीमधील आहे.
गिलने हे फोटो तर पोस्ट केले पण त्याचबरोबर कॅप्शन त्याने जरा स्पष्ट शब्दातच लिहिलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, फक्त प्रेम बाकी काहीच नाही. इंटरनेटवर तुम्ही जे काही पाहता त्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवू नका. हे वाक्य त्याने खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्यानंतर त्याने स्टोरीमध्ये हार्दिकला टॅगदेखील केलं आहे.

हार्दिक पंड्या आणि शुबमन गिल हे भारतीय संघाबरोबरच आय़पीएलमध्ये गुजरात टायटन्स संघात एकत्र खेळले आहेत. २०२२ आणि २०२३ हे दोन वर्षे दोघेही एकाच आयपीएल संघाकडून खेळले आहेत. त्यानंतर गुजरात संघ दोन्ही हंगामात अंतिम फेरीत पोहोचला. २०२४ मध्ये, जेव्हा हार्दिकने आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शुबमनला गुजरातचे कर्णधारपद मिळाले.