SRH vs MI, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. विस्फोटक फलंदाजांची फौज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने या डावात सुपरफ्लॉप सुरूवात केली. दरम्यान इशान किशनच्या विकेटची चांगलीच चर्चा रंगली.

इशान किशन आऊट नव्हताच

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडची जोडी मैदानावर आली. हैदराबादला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. ट्रॅव्हिस हेड शू्न्यावर माघारी परतला.

हेड बाद झाल्यानंतर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. आपाल्या जून्या संगाविरुद्ध इशान किशन कशी कामगिरी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र त्याला एका धावेवर पॅव्हेलियनची वाट धरावी लागली. मात्र स्निको मीटरमध्ये पाहिलं, तेव्हा इशान किशन नॉट आऊट असल्याचं दिसून आलं.

तर झाले असे की, हेड बाद झाल्यानंतर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावेळी दीपक चाहर डावातील तिसरे षटक टाकत होता. डावखुऱ्या हाताच्या इशान किशनला दीपक चाहरने लेग साईडच्या दिशेने शॉर्ट चेंडू टाकला. हा चेंडू इशान किशनने फाईन लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला. ज्यावेळी इशान किशनने शॉट खेळला त्यावेळी बॅट आणि चेंडूचा संपर्क झाल्याचा कुठलाही आवाज झाला नाही. त्यामुळे गोलंदाजानेही अपील केली नाही.

मात्र, शॉट खेळताच इशान किशनने अंपायरच्या निर्णयाची वाट न पाहता क्रिझ सोडलं. तेव्हा अंपायरने बोट उचललं आणि दीपक चाहरने अपील केली. तोपर्यंत इशान किशन बाहेर जायला निघाला होता. मात्र, सर्वांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा स्निको मीटरमध्ये इशान किशन नॉटआऊट असल्याचं दिसून आलं. स्निको मीटरमध्ये स्पष्टपणे दिसून येत होतं की, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झालेला नाही.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स – रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा