चेन्नई सुपर किंग्सने गुजरातविरूद्ध सामन्यात यंदाच्या सीझनमधील शानदार कामगिरी करत विजयाने सांगता केली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरातचा ८३ धावांनी पराभव केला. या पराभवासह प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या गुजरातवर टॉप-२ मधून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. चेन्नईने या सामन्यात गुजरातला पुनरागमनाची संधी दिली नाही. तिन्ही विभागात शानदार कामगिरी करत सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला. दरम्यान या सामन्यात सुरेश रैनाने मोठी ब्रेकिंग बातमी दिली आहे.
गुजरात-चेन्नई सामन्यात समालोचन करताना सुरेश रैनाने एक मोठा खुलासा झाला आहे. चिन्ना थाला म्हणून ओळख असलेला माजी सीएसके फलंदाज सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जमध्ये परतू शकतो. आयपीएल २०२६ मध्ये फ्रँचायझी त्याला मोठी जबाबदारी देऊ शकते, हा खुलासा त्यानेच केला आहे.
सुरेश रैना आकाश चोप्रा आणि संजय बांगर यांच्याबरोबर चेन्नई-गुजरात सामन्यात समालोचन करत होता. यादरम्यान सुरेश रैना म्हणाला, “पुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला एक नवीन फलंदाजी प्रशिक्षक मिळणार आहे.” यावर आकाश चोप्रा म्हणाला, “त्याचे नाव (S) ने सुरू होते. चोप्रा म्हणतो चल आता खुलासा करूनच टाक.” पण, हे ऐकल्यानंतर रैना हसायला लागतो.
आकाश पुढे म्हणाला: “चला, सर्वात आधी तुम्ही हे इथे ऐकलंय!” रैनाने २०१४ मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतकांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू आहे. सुरेश रैनाने समालोचन करत बोलताना फलंदाजी कोच म्हणून सुरेश रैनाशी चर्चा करत असल्याचे संकेत त्याने दिले आहेत. यावरून सोशल मीडियावर रैना आयपीएलल २०२६ मध्ये संघाचा फलंदाजी कोच असणार याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माइक हसी सध्या चेन्नई संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहेत, तो २०१८ पासून सीएसके संघाबरोबर आहे. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी अर्धशतके झळकावल्याने चेन्नईने टायटन्सवर ८३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आयपीएल मोहिमेची सांगता केली. अहमदाबादमध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चेन्नईने २३१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. त्यानंतर गोलंदाजांनी प्लेऑफसाठी आधीच पात्र ठरलेल्या गुजरातला १८.३ षटकांत १४७ धावांत बाद केले.