Suryakumar Yadav’s Bowled Video: घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्सने अत्यंत रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या. दरम्यान या सामन्यात सूर्याला बाद केल्यानंतर यश ठाकुरने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सच्या डावात लखनऊ सुपरजायंट्सचा गोलंदाज यश ठाकुर १५वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने आपल्या पहिल्या शानदार चेंडूवर सूर्यकुमार यादवला चकवा देत क्लिन बोल्ड केले. सूर्या हा चेंडू यष्टिरक्षकाच्या डोक्यावरुन मागे मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचा हा प्लॅन फसला आणि तो बाद झाला. आजच्या सामन्यात सूर्या काही खास खेळी करु शकला नाही. तो ९ चेंडूत फक्त ७ धावा करुन बाद झाला. सूर्याला बाद केल्याने मुंबईला मोठा धक्का बसला आणि यश ठाकुरला आकाश ठेंगणे झाले. त्याने विकेटचे जोरदार सेलिब्रेशन केले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Match Highlights in Marathi
IPL 2024 RCB vs SRH : धावांचा महापूर सुफळ संपूर्ण; दिनेश कार्तिकची झुंज व्यर्थ
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
Delhi Capitals vs Chennai Super Kings IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 DC vs CSK Highlights : दिल्ली कॅपिटल्सने उघडले विजयाचे खाते, चेन्नई सुपर किंग्जच्या विजयी रथाला लागला ब्रेक
KKR beat RCB in IPL 2024
RCB vs KKR : कोलकाताचा बंगळुरूमध्ये विजयी विक्रम कायम, केकेआरकडून आरसीबीचा ७ गडी राखून पराभव

मुंबईला शेवटच्या षटकात ११ धावा करायच्या होत्या –

शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सला विजयासाठी ११ धावांची गरज होती. त्यावेळी फलंदाज टीम डेव्हिड आणि स्फोटक खेळाडू कॅमेरून ग्रीन क्रीजवर होते. लखनऊच्या कर्णधाराने मोहसीन खानकडे चेंडू सोपवला. मग काय मोहिसनने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे मुंबईला पाच धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या षटकात मुंबईच्या फलंदाजांना चौकारही मारता आला नाही.

मुंबईला १७८ धावांचे लक्ष्य दिले –

हेही वाचा – MI vs LSG: क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्सचा ‘हा’ विक्रम मोडत केला मोठा कारनामा

मार्कस स्टॉइनिसच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीगच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ बाद १७७ धावा केल्या. स्टॉइनिसने ४७ चेंडूत नाबाद ८९ धावा केल्या, तर कर्णधार क्रृणाल पंड्या ४२ चेंडूत ४९ धावा करून निवृत्त झाला. मुंबईतर्फे जेसन बेहरेनडॉर्फने चार षटकांत ३० धावा देत दोन गडी बाद केले.