scorecardresearch

SRH vs RR: ट्रेंट बोल्टचा धमाका! पहिल्याच षटकात हैद्राबादचे दोन फलंदाज माघारी, पाहा भेदक गोलंदाजीचा Video

IPL 2023 Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Score : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने एकाच षटकात दोन फलंदाजांना बाद केलं.

IPL 2023 SRH vs RR Match
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅच अपडेट्स

IPL 2023, SRH vs RR Cricket Score Update : इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळवला जात आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत हैद्राबादच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. राजस्थानचा सलामीवीर दिग्गज फलंदाज जॉस बटलरने मागील हंगामात धावांचा पाऊस पाडला होता. या सामन्यातही त्याने राजस्थानला धावांच्या दुष्काळात राहू दिले नाही. कारण बटलरने यंदाच्या आयपीएल हंगामातही धडाकेबाज फलंदाजीला सुरुवात केली असून हंगामातील वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाची नोंद त्याच्या नावावर करण्यात आली आहे.

इतकच नव्हे तर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसनेही अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटाकांत ५ विकेट्स गमावत २०३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैद्राबादच्या फलंदाजांची मात्र पुरती दमछाक झाली. कारण राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात हैद्राबादच्या राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्माला स्वस्तात माघारी पाठवले. बोल्टने या दोन फलंदाजांना बाद केल्याचा व्हिडीओ आयपीएलच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – Video: शेवटच्या चेंडूवर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ गौतमला खेळवला अन् दिल्लीची अवस्था झाली ‘गंभीर’; गड्यानं थेट षटकारच ठोकला

राजस्थानसाठी सलामीला उतरलेल्या यशस्वी जैस्वालने ३७ चेंडूत ५४ धावा केल्या. तसंच जॉस बटलरने चौफर फटकेबाजी करत २२ चेंडूत ५४ धावा कुटल्या. कर्णधार संजू सॅमसननेही हैद्राबादच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूत ५५ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तर हेटमायर १६ चेंडूत २२ धावांवर नाबाद राहिला. उमरान मलिकच्या वेगवान चेंडूने देवदत्त पड्डीकलचा त्रिफळा उडवला. तो अवघ्या २ धावांवर माघारी परतला. तसंच रियान परागनेही निराशाजनक कामगिरी केली. रियान ७ धावांवर बाद होत तंबूत परतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 18:46 IST

संबंधित बातम्या