Virat Kohli Breaks Kieron Pollard’s Record: आयपीएल २०२३ च्या ६० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात बंगळुरूने राजस्थानचा ११२ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ ५९ धावांत गारद झाला. दरम्यान विराट कोहलीने एक विक्रम रचला आहे.

विराट कोहलीने बॅटने काही कमाल केली नाही. पण राजस्थानविरुद्ध क्षेत्ररक्षणात उतरल्यावर त्याने एक मोठा विक्रम केला. विराटने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच षटकात राजस्थानचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालचा झेल घेत किरॉन पोलार्डला मागे टाकले. आता तो नॉन-विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. मिस्टर आयपीएल सुरेश रैना या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याचवेळी, आयपीएलमध्ये केवळ ३ विकेटकीपर नसलेले असे खेळाडू आहेत, ज्यांनी १०० हून अधिक झेल घेतले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू (विकेटकीपर नसलेले) –

१. सुरेश रैना – १०९
२. विराट कोहली – १०४
३. किरॉन पोलार्ड – १०३
४. रोहित शर्मा – ९८

हेही वाचा – KL Rahul: वॉकरचा आधार घेऊन चालताना दिसला केएल राहुल; शस्त्रक्रियेनंतरचा फोटो व्हायरल

राजस्थानचा सर्वात मोठा पराभव –

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०.३ षटकांत ५९ धावांत गारद झाला. आयपीएलच्या इतिहासातील राजस्थान रॉयल्सचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav: ‘आता लोक म्हणणार नाहीत देविशा आली होती, म्हणूनच मी शतक झळकावू शकलो नाही’; सूर्याचे टिकाकारांना चोख प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचलेला राजस्थान रॉयल्सचा संघ यावेळी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) कडून त्याचा ११२ धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर घसरला. सहा विजय आणि सात पराभवानंतर १३ सामन्यांत त्यांचे १२ गुण आहेत. राजस्थानचा निव्वळ रनरेट +०.१४० आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना १९ मे रोजी पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय आवश्यक आहे. यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.