दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात खास बंध आहे. मैत्रीचे हे खास नाते सांगूनही डीव्हिलियर्स विराट कोहलीला काहीही बोलायला घाबरतो आणि त्यामागे एक कारण आहे. एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीत विराट कोहलीची अज्ञात बाजू उघड केली होती आणि त्याच्याशी संबंधित एक-दोन गोष्टीही शेअर केल्या होत्या. त्यात विराट कोहलीने देखील मनमोकळ्या गप्पा मारत अनेक खुलासे केले आहेत.

एबी डिव्हिलियर्सने गौरव कपूरच्या चॅट शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’मध्ये सांगितले की कोहलीला सर्वांना आश्चर्यचकित करायला कसे आवडते हे सांगितले आहे. डिव्हिलियर्स आणि कोहली दोघेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) एकत्र खेळले आहेत. कोहली अजूनही खेळत असून डिव्हिलियर्सने नोव्हेंबर २०२१ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि गेल्या वर्षी तो आरसीबीकडून खेळला देखील नाही. पण आयपीएलमध्ये एकाच संघासोबत खेळताना दोघांमधील मैत्री ही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या महान खेळाडूला विराट कोहली आपला भाऊ मानतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावल्यानंतर दिलासा मिळाला- कोहली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने शानदार खेळी केली. या सामन्यात भारताच्या माजी कर्णधाराने १८६ धावा केल्या होत्या. त्याचवेळी आता विराट कोहलीने या खेळीवर मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “त्या सामन्यात जेव्हा मी मोठी धावसंख्या केली तेव्हा मला खूप मोठा दिलासा मिळाला होता. याशिवाय मी खूप उत्साही होतो.” वास्तविक, विराट कोहली यूट्यूब चॅनलवर त्याचा माजी आरसीबी सहकारी एबी डिव्हिलियर्सशी बोलत होता.

हेही वाचा: IND vs AUS: सामना सुरु असताना अचानक केला ‘या’ पक्षाने हल्ला, स्टॉयनिससह पांड्याचीही बसली पाचावर धारण; Video व्हायरल

विराट कोहली म्हणाला की, “मी एबी डिव्हिलियर्ससोबत बराच काळ सतत चर्चा करत होतो. मला कसोटीचे स्वरूप किती आवडते हे त्याला माहीत आहे. तो म्हणाला की, “एकदिवसीय व्यतिरिक्त, मी टी२० फॉरमॅटमध्ये सातत्याने धावा करत होतो, पण टेस्ट फॉरमॅटमध्ये चांगल्या सुरुवातीचे मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करू शकलो नाही. त्याचवेळी त्याने कसोटी क्रिकेटवर किती प्रेम आहे याचा पुनरुच्चार केला. याशिवाय विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्ससोबत इतरही अनेक विषयांवर चर्चा केली.”

विराट कोहलीबद्दल खुलासा करताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला होते, “जेव्हा मला कळले की त्याच्या सारखीच फलंदाजी करणारी व्यक्ती जी भारतात इतकी ‘मोठी’ आहे, त्यावेळी मला खूप आनंद झाला. मी कोहलीला जीवनातील छोट्या गोष्टींचा आनंद घेताना पाहतो आणि त्याच्यासाठी ती खूप महत्वाचे गोष्ट आहे. तो इतर लोकांसाठी वेळ काढतो, जे त्याच्यासारख्या व्यक्तीसाठी खूप कठीण आहे. त्याला काहीही बोलायला मला भीती वाटते. सांगितलेली वस्तू किंवा गोष्ट तो लगेच हजर करतो. उदाहरण द्यायचे तर मी म्हटलं तर अरे मला तुझे शूज आवडतात, पुढच्या क्षणी माझ्यासाठी त्याच शूजची तो व्यवस्था करतोच.”

हेही वाचा: IND vs AUS 3rd ODI: रोहित शर्माने सांगितले पराभवाचे सर्वात मोठे कारण; म्हणाला, ”अशा सामन्यांमध्ये ‘ही’ गोष्ट खूप महत्वाची”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एबी डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “मी म्हणालो अरे खरच गंमत केली तर तो सिरिअस होऊन लगेच ती गोष्ट करतो. एवढेच नाही तर मी विराटला नाही नाही… करू नको, पण तो करणार म्हणजे करणारच. तो सर्वांची काळजी घेतो. मी त्याला एक दिवस सांगितले की मला कॉफी आवडते. आता मला एक एस्प्रेसो मशीन मिळत आहे, जे त्याने ऑर्डर केले होते.” असे अनेक गमतीदार किस्से त्याने सांगितले.