Anushka Sharma Ignored Virat Kohli Video Viral: विराट कोहली सध्या आयपीएल २०२५ मध्ये व्यग्र आहे. दरम्यान हल्लीच अनुष्काच्या वाढदिवसाला शेअर केलेली पोस्ट खूप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये त्याने अनुष्काचं कौतुक केलं होतं. विराट कोहली आणि अनुष्का शर्माकडे आयडियल कपल म्हणून पाहिलं जातं. विराट-अनुष्काचे फोटो, व्हीडिओ कायम समोर येत असतात. दरम्यान विराट-अनुष्काचा एक व्हीडिओ समोर आलाय, ज्यामध्ये अनुष्काने त्याचा हात पकडायला नकार दिला आणि निघून गेली.
विराट कोहली काही दिवसांमध्ये एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होता. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अवनीत कौर हिचा फोटो चुकून लाईक केला होता. याबाबत कोहलीने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत स्पष्टीकरणही दिलं होतं. या सर्व प्रकरणानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पहिल्यांदाच दिसले होते. विराट-अनुष्का बंगळुरूमधील रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटसाठी जात होते. यादरम्यानचा त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
अवनीत कौरच्या फोटोला लाईक केल्यानंतर जेव्हा हे प्रकरण वाऱ्यासारखे पसरले तेव्हा विराटला स्पष्टीकरण द्यावे लागले. त्याच्या स्पष्टीकरणात, त्याने म्हटले होते की अवनीतचा फोटो लाईक करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. मोबाईल फीड क्लियर करताना, अल्गोरिथमने चुकून इंटरअअॅक्शन रजिस्टर केलं असेल. विराटच्या त्या एका लाईकमुळे अवनीत कौर रातोरात लोकप्रिय झाली. पण सध्या त्याच्यात आणि अनुष्कामध्ये सर्व काही ठीक नाहीये असे दिसतंय. हे या व्हीडिओवरून समोर आल्याचं चाहते म्हणत आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनुष्का गाडीतून उतरत आहे. ती गाडीतून उतरत असताना, विराट तिचा हात धरण्यासाठी हात पुढे करून समोर उभा आहे. पण व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की जेव्हा अनुष्का गेटमधून बाहेर येते तेव्हा ती विराट किंवा त्याच्या हाताकडे पाहतही नाही. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि एकटीच पुढे जाते. यामुळे आता अनुष्का विराटवर रागावली आहे का असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
अवनीत कौर घटनेनंतर विराट आणि अनुष्काचे पहिल्यांदाच बाहेर दिसले होते. यामुळेच व्हिडिओमधील ही घटना अवनीत कौर प्रकरणाशी जोडली जात आहे. विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे, पण यादरम्यान तो अनुष्काबरोबर बंगळुरूच्या एमजी रोडवरील रेस्टॉरंटमध्ये डीनर डेटसाठी जाताना दिसला. आरसीबीचा पुढील सामना उद्या म्हणजेच ९ मे रोजी लखनौ संघाबरोबर आहे.