Virat Kohli Naveen ul Haq Fight: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्टेडियमवरील कोहली- गंभीर- नवीन उल हक यांचा वाद आता इंस्टाग्रामवर पेटला आहे. नवीनने बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या दिवशी एक नाही तर दोन पोस्ट टाकल्या. त्याची पहिली पोस्ट विराट कोहली बाद झाल्यानंतर तर दुसरी पोस्ट बंगळुरूच्या पराभवानंतर आली. आता या पोस्टवर अप्रत्यक्षपणे विराट कोहलीने सुद्धा सुनावले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबीच्या पराभवादरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने इंस्टाग्राम स्टोरीजवर ” गोड आंबे” अशा कॅप्शनसह फोटो पोस्ट केला होता. यातून आरसीबी आणि विराट कोहलीला ट्रोल केल्यानंतर, कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याने स्वतःचा खुर्चीवर बसलेला फोटो शेअर करत, “स्पर्धा तुमच्या डोक्यात असते… प्रत्यक्षात ती नेहमी तुम्ही विरुद्ध तुम्हीच असते.” असे कॅप्शन दिले आहे.

नवीन उल हक इंस्टाग्राम स्टोरी (Naveen Ul Haq Instagram Story)

विराट कोहली इंस्टाग्राम पोस्ट (Virat Kohli Instagram Post)

दरम्यान, अफगाणिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने यापूर्वीही एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “लोकांशी तुम्ही जसे वागाल तसेच लोकं तुमच्याशी वागतील. जे तुम्ही लोकांना द्याल तेच परत तुम्हाला जसेच्या तसे मिळेल. मग ते चांगले असो किंवा वाईट.”

आरसीबी आणि लखनऊ यांच्यातील सामन्यादरम्यान नवीन आणि विराटमध्ये वाद झाला होता. विराट- नवीन व गौतम गंभीर अशा या वादात बीसीसीआयने तिघांनाही अनुक्रमे ५० व १०० टक्के दंड केला होता, जो नंतर रद्द करण्यात आला होता.

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकर, धोनीनंतर विराटच्या आयुष्यात शेवटी ‘तो’ क्षण आलाच; वानखेडेतील फोटो पाहून चाहते भावुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, आयपीएल २०२३ चा ५४ वा सामना मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने १६.३ षटकांत ४ गडी गमावून २०० धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला.