Nehal Wadhera Mumbai Airport Video Viral : मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज नेहल वढेराने अप्रतिम फलंदाजी करून मैदानात छाप टाकली आहे. मुंबई इंडियन्सने इतर खेळाडूंच्या तुलनेत त्याची खूप काळजी घेतली आहे. पण जेव्हा चुकीचं काही घडतं तेव्हा हाच संघ शिक्षा देण्यातही मागे नाही. नेहल वढेरालाही मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने एका चुकीसाठी शिक्षा दिली आहे. मुंबई इंडियन्सने फलंदाजांची मिटिंग आयोजीत केली होती. परंतु, नेहल त्या मिटिंगला उशिरा पोहोचला होता. त्यामुळे मॅनेजमेंटने मुंबई विमानतळावर नेहल वढेराला पॅड घालून चालण्याची शिक्षा दिली. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. पण ही शिक्षा दिल्याने युवा फलंदाज विमानतळावर लाजल्याचं व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सच्या मिटिंगमध्ये वेळेवर न येणाऱ्या खेळाडूंना कठोर शिक्षा देण्याऐवजी अशाप्रकारे त्यांच्यावर मजेशीर कारवाई करण्याच्या मुंबईने निर्णय घेतला आहे. तसंच खेळाडूंना चांगल्या पद्धतीने डिजाईन केलेले पनिशमेंट सूट घालावे लागतात. मुंबई इंडियन्सने नेहलला दिलेल्या शिक्षेचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, नेहल विमानतळावर पारंपरिक सूटऐवजी बॅंटिंग पॅडसोबत…नेहलला मिटिंगमध्ये उशिरा पोहोचल्याचा पश्चाताप झाला आहे.

नक्की वाचा – SRH vs GT: गुजरातसाठी शुभसंकेत! नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुबमन गिलची झुंझार खेळी, IPL मध्ये पहिल्या शतकाला गवसणी

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई इंडियन्सने पंजाबसाठी रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या लुधियानाच्या या युवा क्रिकेटरला २० लाख रुपयात खरेदी केलं होतं. नेहलने या सीजनमध्ये चांगली फलंदाजी करत मुंबईला सामने जिंकवून दिले आहेत. त्यामुळे भविष्यात त्याला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. नेहलने या टूर्नामेंटमध्ये १०० मीटरचा षटकार ठोकून सर्वांचं लक्ष वेधलं होतं.