पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सोहेल खान सध्या चर्चेत आहे. तो भारतीय संघातील खेळाडूंवर टीका करुन चर्चेच राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने विराट कोहली, गौतम गंभीर आणि उमरान मलिक यांच्याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेपटूने इरफानने त्याला एका शब्दात उत्तर दिले आहे. त्याचबरोबर त्याची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोहेलने अलीकडेच खुलासा केला होता की, त्याने एका सामन्यात विराट कोहलीला असे सांगून गप्प केले होते की, बेटा तेव्हा तू अंडर-१९ खेळत होतास, तेव्हा तुझा बाप कसोटी क्रिकेपटू होता. यानंतर तो म्हणाला की, आमच्याकडे उमरान मलिकसारखे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज आहेत. आता भारताचा दिग्गज क्रिकेटपटू इरफान पठाणने या गोलंदाजाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मेजर साहेब, असे विधान करून त्यांना लक्ष वेधून घ्यायचे आहे –

मेजर गौरव आर्य (निवृत्त) यांच्या ट्विटवर टिप्पणी करताना इरफान पठाण म्हणाला, ”मेजर साहेब, असे विधान करून त्यांना लक्ष वेधून घ्यायचे आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.” वास्तविक, गौरव आर्यने ट्विट केले होते की, “पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतात की आमचे देशांतर्गत क्रिकेट उमरान मलिक सारख्या लोकांनी भरलेले आहे. जावेद मियांदादने इरफान पठाणबद्दलही असेच म्हटले होते. त्यानंतर इरफान पाकिस्तानला गेला आणि पाकिस्तान संघाचा बँड वाजवला होता. यार, तुम्ही लोक थोड कमी बोलत जावा.”

इरफान पठाणची ट्विटरवर टिप्पणी

मियांदादने इरफानवर केली होती टिप्पणी –

मियांदादही आपल्या वक्तव्यामुळे टीकाकारांच्या निशाण्यावर होता. २००४ च्या भारत-पाकिस्तान मालिकेपूर्वी इरफानबद्दल बरीच चर्चा झाली होती. खासकरून २००३-०४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या मालिकेत त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे, इरफानला क्रिकेट जगतात ओळख मिळाली.

हेही वाचा – Asia Cup 2023: टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही; मार्चमध्ये स्थळ ठरणार, यजमानपदाच्या शर्यतीत यूएई आघाडीवर

त्यावेळी पाकिस्तानचे प्रशिक्षक असलेल्या मियांदाद म्हणाला होता की, “इरफान पठाणसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीत सापडतात”. त्या वेळी इरफानने या कमेंटवर प्रतिक्रिया न देता आपल्या कामगिरीने मियांदादला गप्प केले होते. आता इरफानने पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेटपटूची बोलती बंद केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irfan pathan gave a one word reply to pakistani cricketer sohail khans comments on team india players vbm
First published on: 05-02-2023 at 11:16 IST