भारतीय क्रिकेट संघ सध्या वर्कलोडवर विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनासाठी संघातील खेळाडूंना विश्रांती दिली जात आहे. कोचिंग स्टाफही रजेवर जाताना दिसत आहे. अशात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने यावर आपले मत मांडले आहे. त्याने सांगितले की, जेव्हा तो संघासाठी सतत खेळत होता, तेव्हा त्याच्या कार्यकाळात वर्कलोड ही संज्ञा आली नव्हती.

झहीर खाननंतर १०० कसोटी खेळणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ टिकून आणि राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे विशेषत: वेगवान गोलंदाजाने शक्य तितकी गोलंदाजी केली पाहिजे, असे इशांत मानतो. टीम इंडिया आपल्या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतींच्या वाढत्या संख्येमुळे हैराण झाली आहे. अशा स्थितीत इशांत म्हणतो की, वेगवान गोलंदाज जितकी जास्त गोलंदाजी करेल, तितकी त्याला दुखापत होण्याची शक्यता कमी आहे.

इशांत शर्माने स्पोर्ट्सस्टारला सांगितले की, “सध्या मी एवढेच म्हणेन की वर्कलोडबद्दल जास्त विचार करू नका. अलीकडच्या काळात ही एक नवीन संज्ञा आहे, विशेषत: वेगवान गोलंदाजांसाठी. माझ्या कारकिर्दीत असे कधीच पाहिले नाही. जेव्हा मी खेळायला सुरुवात केली, माझे प्रशिक्षक जुन्या पद्धतीचे प्रशिक्षक होते. जे मला दुपारी १ वाजता चेंडू द्यायचे आणि आम्ही सूर्यास्तापर्यंत गोलंदाजी करायचो. जेव्हा मी रणजी ट्रॉफी खेळलो आणि नंतर भारतासाठी जेव्हा मी पदार्पण केले, तेव्हा मी मोठे स्पेल टाकू शकत होता. जर तुम्हाला सुधारणा करायच असेल तर तुम्ही फक्त गोलंदाजी करत रहा.”

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: मेस्सीच्या गोलमुळे ‘या’ कंपनीचे शेअर्स भिडले गगनाला, फिफा दरम्यान स्टॉकला आले रॉकेटचे स्वरुप

दुखापतीबद्दल पुढे बोलताना इशांत म्हणाला, “मला वाटतं, जर तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमधून नाव कमावले असेल, तर त्यानंतरचे सामने खेळण्यासाठी तुम्ही निवडक नसावे. जर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेट खेळायचे असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा तुम्ही देशासाठी योग्य प्रमाणात क्रिकेट खेळले असेल, तेव्हा वेळोवेळी विश्रांती दिली जाते. बहुतेक वेगवान गोलंदाज रणजी ट्रॉफी सामन्यांदरम्यान तुटतात कारण ते आदर्श तयारी करत नाहीत.”

हेही वाचा – FIFA World Cup 2022 ने भारतातील सर्व विक्रम काढले मोडीत; तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिला फायनल सामना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तो पुढे म्हणाला, “रणजी ट्रॉफीमध्ये गोलंदाजी हा एक वेगळा बॉलगेम आहे. जर तुम्ही आयएएस परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर तुम्हाला दिवसाचे १६ तास अभ्यास करावा लागेल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही संपूर्ण रणजी ट्रॉफी हंगाम संपवला आणि २० षटके टाकायची असतील तर. एक दिवस, तुम्ही ब्रेक घेऊन तयारी करू शकत नाही. तुम्हाला त्यानुसार तयारी करावी लागेल. जर तुम्हाला नेटमध्ये दिवसातून २५ षटके टाकण्याची सवय असेल, तरच तुम्ही एका दिवसात २० षटके टाकू शकता.”