Jamie Overton, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव जवळजवळ निश्चित होता. पण भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करून हा पराभव टाळला. सध्या या मालिकेत इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. पण इंग्लंडला जर ही मालिका जिंकायची असेल, तर शेवटच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. तर दुसरीकडे मालिका बरोबरीत समाप्त करण्यासाठी भारतीय संघाला पुढील सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. दरम्यान या सामन्याआधी इंग्लंडने आपल्या संघात मोठा बदल केला आहे.

मालिकेतील पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना ओव्हलमध्ये रंगणार आहे.या सामन्यासाठी इंग्लंडने अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटनला मुख्य संघात स्थान दिलं आहे. या महत्वाच्या सामन्याआधी त्याचा १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. ओव्हरटनला २०२२ मध्ये लीड्सच्या मैदानावर एकमात्र कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने २ गडी बाद केले होते. तर फलंदाजी करताना त्याने ९७ धावांची दमदार खेळी केली होती. त्याला आयपीएल २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ३ सामने खेळण्याची संधी मिळाली होती.

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघात एकमेव बदल

इंग्लंडने पाचव्या कसोटीसाठी हा एकमेव बदल केला आहे. तर उर्वरीत १४ खेळाडू तेच आहेत जे गेल्या सामन्यातही संघाचा भाग होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्याने ९८ सामन्यांमध्ये २३७ गडी बाद केले आहेत. यादरम्यान फलंदाजी करताना त्याने २४०१ धावा केल्या आहेत. त्याची ही दमदार कामगिरी पाहता त्याला पुन्हा एकदा इंग्लंड संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघाकडे मालिका बरोबरीत आणण्याची संधी

या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडवर दमदार विजयाची नोंद केली. सुरूवातीचे २ सामने झाल्यानंतर मालिका १-१ ने बरोबरीत आली होती. मात्र, मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुन्हा एकदा विजय मिळवला आणि इंग्लंडवर २-१ ने आघाडी घेतली. मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने विजयासाठी पूर्ण जोर लावला. भारतीय संघाच्या हातून सामना निसटला होता. पण शेवटी रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने मिळून सामना ड्रॉ केला. त्यामुळे मालिकेतील पाचवा सामना निर्णायक असणार आहे.

मालिकेतील पाचव्या सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेन स्टोक्स (कर्णधार),जोफ्रा आर्चर, गट एटकिंसन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.