Jasprit Bumrah records in IND vs AUS Perth Test : ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी सामने जिंकण्यात अनेक कर्णधारांना यश आले आहे, पण जसप्रीत बुमराहच्या संघाने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्थमध्ये जे केले, त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला आहे. भारताच्या ५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ५८.४ षटकात २३८ धावांवर गडगडला. अशा प्रकारे टीम इंडियाने पर्थ कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव करत मोठा विजय नोंदवला. यासह बुमराहने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या १५० धावांत गडगडला. यानंतर जसप्रीत बुमराहने एकट्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आणि ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात १८ षटके टाकत ५ विकेट्स घेत खळबळ उडवून दिली. बुमराहच्या धोकादायक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झाली आणि यजमान संघ पहिल्या डावात केवळ १०४ धावांत गारद झाला. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही ३ विकेट्स घेण्यात यश मिळवले. या शानदार कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बुमराहने हा मोठा पुरस्कार जिंकताच त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला.

जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियात कमाल –

वास्तविक, बुमराहला कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्याच वर्षी २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याला हा पुरस्कार देण्यात आला होता. हा तिसरा सामनावीर पुरस्कार जिंकून, बुमराह ऑस्ट्रेलियातील कसोटीत सामनावीर पुरस्कार जिंकणारा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. बुमराह कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटीत सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव यांनी १९८५ मध्ये ॲडलेड कसोटीत ही मोठी कामगिरी केली होती.

हेही वाचा – IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर टीम इंडियाचा एकच जल्लोष! बुमराह-विराट आक्रमक झाल्याचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटीत सामनावीर पुरस्कार जिंकणारे भारतीय गोलंदाज –

  • कपिल देव- १९८५
  • जसप्रीत बुमराह- २०२४

हेही वाचा – Ivory Coast : अख्खा संघ ७ धावात तंबूत! टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला असा प्रकार

ऑस्ट्रेलियात कसोटीत सामनावीराचा पुरस्कार जिंकणारे भारतीय कर्णधार –

  • कपिल देव
  • सचिन तेंडुलकर
  • सौरव गांगुली
  • अजिंक्य रहाणे
  • जसप्रीत बुमराह