Jasprit Bumrah over the moon after India win T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२४ च्या टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावत नवा इतिहास रचला. या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. टी-20 विश्वचषक २०२४ च्या स्पर्धेत भारताचा जबरदस्त गोलंदाज जसप्रीत बुमराह ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला आहे. या विश्वचषक स्पर्थेतील आठ सामन्यांत बुमराहने १५ विकेट घेतल्या आणि अनेक वेळा भारताच्या हातून निसटणारे सामने जिंकून दिले.

अंतिम सामन्यातही जसप्रीत बुमराहने ४ ओव्हरमध्ये १८ धावा देत २ विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेला १८ चेंडूत २२ धावांची गरज असताना बुमराहने १८ व्या ओव्हरमध्ये केवळ दोन धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. बुमराहच्या याच स्पेलमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. अखेर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकली, ज्यानंतर नेहमी प्रत्येक सामन्यानंतर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या बुमराहाला देखील आनंदाश्रू रोखता आले नाही. इतर खेळाडूंप्रमाणे तोही रडला.

Ind vs SA T20 World Cup Final: हार्दिक पंड्या भावुक होत म्हणाला, ‘गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं…..पण माझा दिवस येईलच याची खात्री होती’…

“मी खेळानंतर सहसा रडत नाही, परंतु…; जसप्रीत बुमराहला भावना अनावर

यावेळी बोलताना बुमराह म्हणाला की, मी सहसा माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु आज माझ्याकडे बोलायला फारसे शब्द नाहीत, मी खेळानंतर सहसा रडत नाही, परंतु काहीवेळी भावना अनावर होतात.

पुढे तो म्हणाला की, आम्ही अडचणीत होतो पण त्या परिस्थितीतही जिंकण्यासाठी आम्ही तय्यार होतो. माझे कुटुंब येथे आहे, आम्ही गेल्या वेळी जवळ आलो आणि आम्ही काम पूर्ण केले, आपल्या संघाला अशा स्पर्धेत विजय मिळवून देण्यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली भावना असूच शकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नेहमी एका वेळी एक चेंडू आणि एक ओव्हरचा करतो विचार”

बुमराह म्हणाला की, खूप छान वाटले, स्वतःला बुडबुड्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, एकाग्रता भंग करू शकतील अशा गोष्टींपासून दूर राहिलो. खूप पुढचा विचार न करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मोठा दिवस येतो तेव्हा तुम्हाला ते करावेच लागेल, हे मला संपूर्ण स्पर्धेत स्पष्टपणे जाणवले. मी नेहमी एका वेळी एक चेंडू आणि एक ओव्हरचा विचार करतो, फार पुढचा विचार करत नाही. भावना अनावर होतात, आणि त्या होतही होत्या, पण त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.