Jasprit Bumrah Cryptic Post: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बुधवारी (ICC) कसोटी सामन्यातील गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. टीकाकारांना शांततेत चपराक लगावल्यावर आता बुमराहची एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेच्या चर्चांविषयी आपण वाचले असल्यास आपल्याला माहित असेलच की, बुमराहने टीम इंडियाला सोमवारी दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून देत, मालिकेचे पॉईंट्स समसमान पातळीवर आणण्यात मोठे योगदान दिले होते. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यानंतर बुमराहने आयसीएसीच्या नव्याने जाहीर झालेल्या पुरुषांच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या गोलंदाजाचे स्थान मिळवले आहे.

जसप्रीत बुमराहने काय गमावलं, काय कमावलं?

आपल्या माहितीसाठी सांगायचे तर, बुमराह २०२२ मध्ये पाठीच्या फ्रॅक्चरमुळे बुमराहला मोठा ब्रेक घ्यावा लागला होता. या दुखापतीमुळे बुमराह २०२२ आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियात टी २० विश्वचषकातूनही बाहेर पडला होता. क्रिकेटपासून ११ महिने दूर राहिल्यानंतर, बुमराह आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघात परतला होता. २०२३ मध्ये बुमराह भारताच्या आशिया चषकाच्या संघाचा सुद्धा भाग होता. गेल्या वर्षी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीसह बुमराहने भारतीय गोलंदाजीची बाजू भक्कम केली होती.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Rohit Sharma 17 times Golden Duck
MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा उप-कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या बुमराहने विशाखापट्टणममध्ये ‘रिव्हर्स स्विंग’ च्या बळावर इंग्लंडच्या संघाला पराभवाकडे ढकलले. नऊ विकेट्स मिळवून विझाग येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला आणि बुमराहला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारताच्या शानदार विजयानंतर, बुमराहने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या जागी पहिल्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज म्हणून स्थान मिळवले आहे.

जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची ही सुवर्ण कामगिरी केल्यावर बुमराहने सर्व टीकाकारांना एकाच पोस्टमधून सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘पाठिंबा देणारे विरुद्ध अभिनंदन करणारे’ यामधील फरक दाखवणारी बुमराहची पोस्ट सोशल मीडियावर आता चर्चेत आली आहे. जेव्हा एखादा खेळाडू किंवा एखादी व्यक्ती तिच्या कामात मेहनत घेत असते तेव्हा तिला सतत पाठिंबा देणाऱ्यांमध्ये एखादाच चेहरा असतो पण जेव्हा त्या मेहनतीचे फळ मिळते तेव्हा त्याचा आनंद साजरा करायला लोक गर्दी करतात असा विरोधाभास दाखवत बुमराहने टीकाकारांना टोलवले आहे.

हे ही वाचा<< AUSW vs SAW : आऊट की नॉट आऊट? आंतरराष्ट्रीय सामन्यात महिला अंपायरचा उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल

आयसीसीच्या गोलंदाजीत अव्वल स्थान मिळवणारा बुमराह हा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशनसिंग बेदी यांनी यापूर्वी अशीच कामगिरी केली होती.