Jay Shah Reveals About Ishan-Shreyas : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठा खुलासा केला आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्याचा निर्णय कोणी घेतला, हे शाह यांनी सांगितले आहे. हा निर्णय पूर्णपणे अजित आगरकरांचा होता, असे जय शाह यांचे म्हणणे आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने यावर्षी जारी केलेल्या वार्षिक करारात स्थान मिळाले नाही, त्यानंतर अनेक दिग्गजांनीही बोर्डाच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त केले होते. आता जय शाह म्हणाले की, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करार यादीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा होता.

खरं तर, बीसीसीआयच्या निर्देशानंतरही इशान आणि अय्यरला देशांतर्गत स्पर्धा न खेळल्याबद्दल करारातून बाहेर ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर इशानने दीर्घ विश्रांती घेतली आणि थेट चालू आयपीएलमध्ये परतला. त्याच वेळी, अय्यरने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमधील उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह काही सामने खेळले. मुंबईचा संघ रणजी खेळत असताना अय्यर कोलकाता नाईट रायडर्सच्या मुंबई कॅम्पमध्ये सहभागी होत होता.

बीसीसीआयचे सचिव जय शाह काय म्हणाले?

बीसीसीआय कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना जय शाह म्हणाले, “तुम्ही संविधान पाहू शकता. मी फक्त निवड समितीचा निमंत्रक आहे. या प्रकरणी जो काही निर्णय घेतला गेला, तो मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी घेतला आहे. माझी भूमिका फक्त निवड समितीची मते स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करण्याची आहे. टीम इंडियासाठी कोणताही खेळाडू फार महत्त्वाचा नाही. जेव्हा इशान आणि अय्यर कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर झाले, तेव्हा आम्हाला संजू सॅमसनसारखा चांगला खेळाडू मिळाला. त्यामुळे भारतीय खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य द्यावे लागेल.”

हेही वाचा – IPL 2024 : ‘…म्हणून तुम्ही काय लाल किल्ल्यावर झेंडा रोवला नाही’, मोहम्मद शमीची संजीव गोयंकांवर परखड भाषेत टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिक पंड्याबद्दल बोलताना बीसीसीआयच सचिव जय शाह म्हणाले, “मी त्याच्याशी बोललो. प्रसारमाध्यमांमध्येही बातम्या आल्या होत्या. बीसीसीआयने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी त्याची निवड केल्यास, तो विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळण्यास तयार असल्याचेही हार्दिक पांड्याने सांगितले होते. प्रत्येक खेळाडूला नको वाटत असले, तरी त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागते.” गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर इशानशी झालेल्या चर्चेवर शाह म्हणाले, ‘मी त्याला कोणताही सल्ला दिला नाही. तो चांगला खेळला पाहिजे, असा मैत्रीपूर्ण संवाद होता. मी सर्व खेळाडूंशी असेच बोलतो.”