Joe Root broke Rahul Dravid and Allen Border most test fifty record : इंग्लंड संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेची दमदार सुरुवात करत मँचेस्टरमध्ये पहिला सामना चौथ्या दिवशीच ५ गडी राखून जिंकला. या सामन्यात इंग्लंडसमोर चौथ्या डावात विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य होते, ज्यामध्ये एकवेळ ११९ धावा होईपर्यंत ४ विकेट्सल गमावल्या होत्या. इथून जो रूटने एका टोक सांभाळत आधी जेमी स्मिथसोबत महत्त्वाची भागीदारी केली. त्यानंतर ख्रिस वोक्ससह संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. यावेळी त्याने अर्धशतकी खेळी साकारत राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डर यांना मागे टाकले.

जो रुटने ॲलन बॉर्डर आणि राहुल द्रविड यांना मागे टाकले –

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जो रूट ४२ धावांवर बाद झाला होता. यानंतर त्याने दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण ६२ धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर जो रूट आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरनंतर शिवनारायण चंद्रपॉलसोबत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रूटने अनुभवी खेळाडू ॲलन बॉर्डर आणि राहुल द्रविड यांना मागे टाकले आहे, ज्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ६३-६३ अर्धशतकांची नोंद आहे. आता जो रूटच्या नावावर ६४ अर्धशतकांची नोंद झाली आहे.

PAK vs ENG Chris Woakes on Pakistan Team
PAK vs ENG : इंग्लंडच्या गोलंदाजाने विजयानंतर पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘आता खेळपट्टीत बदल केले जातील…’
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
Tim Southee quits New Zealand Test captaincy Ahead of IND vs NZ Test Series
IND vs NZ: भारत दौऱ्यापूर्वी टीम साऊदीकडून न्यूझीलंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा, ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान
WTC Points Table Sri Lanka Beat New Zealand and Improve PCT on 3rd Spot
WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय
Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत
Kamindu Mendis becomes fastest Asian to hit 5 Test hundreds equals Don Bradman Record SL vs NZ
Kamindu Mendis: ८ सामन्यांत पाचवं शतक; कामिंदू मेंडिस विक्रमी खेळीसह डॉन ब्रॅडमन यांच्या मांदियाळीत
Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणारे फलंदाज –

  • सचिन तेंडुलकर – ६८
  • शिवनारायण चंद्रपॉल – ६४
  • जो रूट – ६४
  • ॲलन बॉर्डर – ६३
  • राहुल द्रविड – ६३
  • रिकी पॉन्टिंग- ६२

हेही वाचा – PAK vs BAN : बाबर आझमच्या ‘या’ चुकीमुळे कर्णधार शान मसूद कोच जेसन गिलेस्पीवर भडकला, ड्रेसिंग रूममधील VIDEO व्हायरल

कसोटीत सर्वाधिकवेळा ‘फिफ्टी प्लस’ धावा करण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर पोहोचला –

श्रीलंकेविरुद्ध मँचेस्टर कसोटी सामन्यात ६२ धावांची खेळी साकारल्यानंतर जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘फिफ्टी प्लस’ धावा करण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. रुटची ही ९६ वी खेळी होती. जेव्हा त्याने ‘फिफ्टी प्लस’ धावा केल्या आहेत. या यादीत सचिन तेंडुलकरचे नाव पहिल्या स्थानावर आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ११९ वेळा फिफ्टी प्लस’ धावा केल्या आहेत. याशिवाय इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक ‘फिफ्टी प्लस’ धावा करण्याच्या बाबतीत जो रूट संयुक्तपणे जेफ्री बॉयकॉटसह दुसऱ्या स्थानावर आहे, या दोघांच्याही नावावर १०-१० डावांची नोंद आहे.