AUS vs SA, WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात ७४ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला २०७ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. मात्र, शेवटी मिचेल स्टार्कने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने जोश हेजलवूडसोबत मिळून अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीसह या जोडीने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर, मिचेल स्टार्कने फलंदाजीत कमाल कामगिरी केली. शेवटच्या विकेटसाठी स्टार्क आणि हेजलवूड मिळून ५९ धावा जोडल्या. पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात कुठल्याही जोडीने ५० पेक्षा अधिक धावा जोडल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली आणि जेफ थॉमसन या जोडीच्या नावावर होता. या जोडीने १९७५ मध्ये वेस्टइंडिजविरूद्ध झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात ४१ धावांची भागीदारी केली होती.
आयसीसीच्या स्पर्धेतील स्पर्धेतील अंतिम सामन्यात दहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी
मिचेल मार्श- जोश हेजलवूड – ५९ धावा ( वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, २०२५)
डॅनिस लिली – जेफ थॉमसन- ४१ धावा ( वनडे वर्ल्डकप, १९७५)
सईद किरमानी – बलविंदर संधु – (वनडे वर्ल्डकप, १९८३)
यासह मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. शेवटच्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी करताच या जोडीने बीजे वॉलटींग आणि ट्रेंट बोल्टच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. या जोडीच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या विकेटसाठी ३ वेळेस अर्धशतकी भागीदारी करण्याची नोंद आहे. आता स्टार्क आणि हेजलवूड या जोडीने देखील ३ वेळेस असा कारनामा करत बोल्ट आणि वॉलटींगच्या जोडीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
शेवटच्या विकेटसाठी सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची भागीदारी
मिचेल स्टार्क- जोश हेजलवूड- ३ वेळेस
बीजे वॉलटींग- ट्रेंट बोल्ट – ३ वेळेस
सिडनी कॅलावे- अल्बर्ट ट्रॉट – २ वेळेस
अॅलेन डोनाल्ड- शॉन पोलॉक- २ वेळेस
पॉल अलॉट- बॉब विल्स- २ वेळेस