भारतीय क्रिकेट संघाला १९८३ मध्ये प्रथमच विश्वचषक जिंकून दिले ते माजी भारतीय कर्णधार कपिल देव,  यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. खेळाडूंच्या मानसिक दडपणाबद्दल आणि त्यावर व्यक्त केलेल्या मतांमुळे त्यांना चाहत्यांनी देखील फटकारले असून, आता या दिग्गजाने ही आपली भूमिका कायम ठेवली आहे. माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली आहे, त्यांच्यामते दबाव हा ‘अमेरिकन’ शब्द असून तो त्यांच्या सोयीनुसार केला आहे. ज्या खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळताना किंवा भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करताना दबाव जाणवतो त्यांना पूर्णपणे क्रिकेट खेळणे बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाता येथे एका मेळाव्याला संबोधित करताना, भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने खेळाडूंना त्यांचा दृष्टीकोन बदलण्याचे आवाहन केले आहे, त्यांना खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे आणि जर ते दबाव सहन करू शकत नाहीत तर क्रिकेट खेळणे थांबवावे. देशाचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूला दबावाऐवजी अभिमान वाटला पाहिजे, असेही ते म्हणाले.

“केळं विका केळं नाहीतर अंडी” असे म्हणत कपिल देव यांनी ज्या खेळाडूंना दबाव सहन होत नाही त्यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. कोलकाता येथील एका कार्यक्रमात लांबलचक भाषणात बोलताना त्यांनी सांगितले, ” खेळाडूंनी केळीचा स्टॉल उघडा किंवा अंडी विकण्यासाठी एखादे दुकान टाका. दबाव सहन न करणार्‍या खेळाडूंना मी तरी कधीच खेळाडू म्हणू शकत नाही,” अशी वादग्रस्त टिप्पणी केली.

हेही वाचा:   Sachin Tendulkar: “तुझे नाक तुटले आहे, तुला रुग्णालयात…” जेव्हा पाकिस्तानी गोलंदाज स्लेजिंग करतो तेव्हा, सचिनने सांगितला किस्सा

“मी असे ऐकले आहे की, ‘आम्ही आयपीएल खेळतोय. त्यामुळे आमच्यावर खूप दडपण आहे.’ दडपण हा शब्द खूप सामान्य आहे, बरोबर? ते ज्यांना जाणवणार त्यांना मी ‘खेळू नका’ असे म्हणेल. तुम्हाला कोण विचारत? तुमची ओळख क्रिकेट या खेळामुळे आहे. तुमच्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही. दबाव आणि स्पर्धा या असणारच, त्या पातळीवर जर तुम्ही खेळत असाल तर तुमची प्रशंसा होईल आणि टीकेलाही सामोरे जावे लागेल. तुम्हाला भीती वाटत असेल, टीका सहन करता येत नसेल, मग खेळू नका,” असे कपिल देव यांनी युवा खेळाडूंना चांगलेच फटकारले.

भारताचा माजी कर्णधार पुढे म्हणाला, “तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत आहात आणि तुमच्यावर दबाव आहे? हे कसे शक्य आहे? १०० कोटींच्या देशात तुमच्यापैकी २० खेळाडू खेळत आहेत आणि मग तुम्ही म्हणता की तुमच्यावर दबाव आहे? त्याऐवजी, तुम्ही असा विचार करायला हवा की किंवा असे म्हणा की टीम इंडियासाठी मला खेळण्याची संधी मिळाली आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या खेळाडूंनी स्वतःला भाग्यवान समजायला हवे कारण, तुम्हाला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. भारताकडून खेळणे हा अभिमान घ्यायला शिका. प्रत्येकाच्या नशिबात हे सुख येत नाही”

हेही वाचा:   Ishan Kishan: “जेवढं माहीने केलं त्याच्या आसपास जरी…” इशान किशनने धोनीसाठी काढले गौरवोद्गार

देव पुढे म्हणाले, “प्रेशर हा एक अमेरिकन शब्द आहे. तुम्हाला खेळायचे नसेल तर खेळू नका. तुमच्यावर कोणी जबरदस्ती करत आहे का?  एवढचं वाटत असेल तर जा के केले की दुकान लगाओ या अंडे बेचो. (केळीचा स्टॉल उघडा, अंडी विकायला जा ) पण जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही ती दबाव म्हणून का घेता. एक आनंद म्हणून घ्या आणि मजा करा.” अलीकडच्या काळात अनेक क्रिकेटपटूंनी खेळातून ब्रेक घेतला आहे, खेळाच्या सततच्या मागणीमुळे खेळाडूंना ब्रेक घेणे आवश्यक आहे, त्यात बेन स्टोक्स आणि विराट कोहली यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil dev kele ki dakan lagao unde becho ja ke kapil devs controversial comment on the pressure of playing internationally along with ipl avw
First published on: 20-12-2022 at 18:57 IST