WTC Final Teary Eyed Keshav Maharaj Gives Interview Video: दक्षिण आफ्रिकेने चोकर्सचा टॅग बाजूला सारत २७ वर्षांनी आयसीसी ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे हे दुसरे आयसीसी जेतेपद आहे. या संघाने यापूर्वी १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात पहिले आयसीसी जेतेपद जिंकले होते. ऑस्ट्रेलियाने WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी ५ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. संघाच्या विजयानंतर भारतीय वंशाचा केशव महाराजला अश्रू अनावर झाले होते.

दक्षिण आफ्रिका चॅम्पियन होताच आफ्रिकन संघात आनंदाची लाट उसळली. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या सर्व खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली. दरम्यान संघाचा फिरकी गोलंदाज केशव महाराज आपल्या संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर भावूक झाला आणि त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथशी बोलताना केशव महाराजला रडू कोसळलं आणि जड आवाजातच त्याने पूर्ण मुलाखत दिली.

दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन होण्याबद्दल केशव महाराज म्हणाला, खूप स्पेशल आहे, ही ट्रॉफी उंचावणं सर्वांसाठीच आणि देशासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हे अश्रूदेखील आता आमच्या काय भावना आहेत ते सांगू शकणार नाहीत. गेल्या ५ दिवसांमध्ये सर्वांमधील ही एकता आणि आमचा देशही याचसाठी ओळखला जातो. एक संघ म्हणून, एक राष्ट्र म्हणून, एक अभिमानी देश म्हणून आम्ही खूप आभारी आहोत.

चाहत्यांचे आभार मानताना तो म्हणाला की, मी जर फलंदाजीला गेलो असतो माझ्यातील भावना अधिक मोकळेपणाने मांडू शकलो असतो. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार, प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही खंबीरपणे उभे राहिलो. भविष्यात अजून कमालीच्या गोष्टींकडे हे एक मोठे पाऊल असेल अशी आशा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने २८२ धावांचे लक्ष्य गाठले. आयसीसी फायनलमध्ये यशस्वीरित्या गाठलेले हे सर्वोच्च लक्ष्य आहे. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध २७५ धावांचे लक्ष्य गाठले होते.