भारतीय संघाला पुढील वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. सध्या या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्यात आलेली नाही. दरम्यान, चेतन शर्माची काळजीवाहू निवड समिती या मालिकेसाठी संघ निवडणार असल्याचे वृत्त आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करू शकतो. जाण्यापूर्वी चेतन शर्मा केएल राहुल सहित कोणाकोणाला धक्का देतात ते पाहणे महत्त्वाचे असेल.

भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ जानेवारीपासून मालिका सुरू होणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती संघाची निवड करेल कारण बीसीसीआयच्या सूत्रांनुसार नवीन पॅनल एका आठवड्यात जाहीर होणार नाही. क्रिकेट सल्लागार समिती २६ ते २८ डिसेंबर दरम्यान निवड समितीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या स्पर्धकांची मुलाखत घेईल अशी अपेक्षा होती. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “जुनी समिती कदाचित श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची निवड करेल.”

राहुल बाहेर, हार्दिक जबाबदारी सांभाळेल

सूत्राने सांगितले की, ‘रोहित शर्माच्या अंगठ्याची दुखापत अद्याप बरी न झाल्यास टी२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे असेल. जोपर्यंत केएल राहुलचा संबंध आहे, टी२० मध्ये त्याचे दिवस भरलेले दिसत आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय संघात केवळ या फॉरमॅटच्या तज्ञांनाच स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विराट कोहलीलाही छोट्या फॉरमॅटमधून ब्रेक दिला जाऊ शकतो. भारताच्या टी२० विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर, चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील संपूर्ण समितीला त्यांच्या खराब कामगिरीबद्दल काढून टाकण्यात आले, तर नवीन निवडकर्ते शोधण्याची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत आहे.

हेही वाचा: WTC Points Table: विजय बांगलादेशवर मात्र बाहेर पडला पाकिस्तान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या समीकरणात भारताला दुहेरी फायदा

अधिकाऱ्याने सांगितले की, “चेतन आणि त्याची समिती अजूनही देशांतर्गत क्रिकेट पाहत आहेत. त्याने संपूर्ण विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन फेऱ्या पाहिल्या. बंगाल विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना पाहण्यासाठी देबाशिष मोहंती ईडन गार्डन्सवर उपस्थित होते. या लोकांचा कार्यकाळ २५ डिसेंबरपर्यंत दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: “जर तो मालिकावीर नसता तर…” श्रेयस-अश्विनची भागीदारी ठरली भारताच्या विजयाची खरी शिल्पकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेतन शर्माने पुन्हा अर्ज केला आहे

चेतन शर्मा आणि त्याचा मध्यमगती भागीदार हरविंदर सिंग यांनी निवडकर्त्यांच्या पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. त्यात व्यंकटेश प्रसाद, नयन मोंगिया, मनिंदर सिंग, अतुल वासन, निखिल चोप्रा, अमय खुर्सिया, ज्ञानेंद्र पांडे आणि मुकुंद कुमार यांचाही समावेश आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “चेतन आणि त्याची समिती अजूनही देशांतर्गत क्रिकेट पाहत आहे. त्यांनी विजय हजारे ट्रॉफीचे संपूर्ण सामने पाहिले. या समितीच्या सदस्यांनी रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन फेऱ्यांचे सामनेही पाहिले. बंगाल आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील सामना पाहण्यासाठी देबाशिष मोहंती ईडन गार्डन्सवर उपस्थित होते. त्यांना २५ डिसेंबरपर्यंत दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.”