दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला कसोटी संघाचा नवा उपकर्णधार बनवण्यात आले होते, मात्र तो आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्यापूर्वीच मुंबईत सराव करताना दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला. एएनआयच्या वृत्तानुसार, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार असेल.

सोमवारी, बीसीसीआयने स्पष्ट केले, की रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी प्रियांक पांचाळचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांसाठी १६ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून आता संघाने सरावालाही सुरुवात केली आहे. या दोघांमधील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – ASHES : आधी गावसकर, मग तेंडुलकर..! इंग्लंडच्या जो रूटनं दोघांनाही टाकलं मागे; जाफर म्हणतो, “तो विराटपेक्षाही…”

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी, भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने आधीच स्पष्ट केले, की रोहितच्या अनुपस्थितीत मयंक अग्रवाल केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करेल. मयंकने नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (भारत विरुद्ध न्यूझीलंड) शतक झळकावून स्वतःला सिद्ध केले होते. संघाने मालिका १-० अशी खिशात घातली होती.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, उमेश यादव, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाळ.