ICC Mens Cricket World Cup Super League : बांगलादेशने आर्यलॅंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४ धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर बांगलादेशच्या संघानं आर्यलॅंडविरोधात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. या मालिकेत मिळालेल्या यशानंतर बांगलादेशने वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत भरारी घेतली आहे. बांगलादेशने मालिका जिंकून गुणतालिकेत भारताला मागे टाकलं आहे.

वर्ल्डकप सुपर लीगच्या गुणतालिकेत बांगलादेशचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतीय क्रिकेट टीम चौथ्या स्थानावर आहे. यंदाच्या वर्ल्डकपचं यजमानपद भारत भूषवणार आहे. त्यामुळे भारताला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. भारताशिवाय आणखी ७ संघांना क्रिकेट वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा यात समावेश आहे.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Ayesha Khan, Bigg Boss Fame, Cheers For MS Dhoni During
DC Vs CSK: ‘माही’ला चिअर करणारी ही अभिनेत्री चर्चेत, चेन्नईने सामना गमावला तरीही जिंकली मनं

नक्की वाचा – चेन्नईचा KKR विरोधात पराभव का झाला? कर्णधार एम एस धोनीनं सांगितलं यामागचं मोठं कारण, म्हणाला, “सर्व खेळाडूंनी…”

जे संघ वर्ल्डकपमध्ये क्वालीफाय झाले नाहीत, ते संघ ODI वर्ल्डकप क्वालिफिकेशन राऊंड खेळतील. या राऊंडनंतर टॉपमध्ये असणाऱ्या दोन संघांना वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळेल. वनडे वर्ल्डकपसाठी क्वालिफिकेशन राऊंडची सुरुवात १८ जूनपासून होणार असून १९ जुलै शेवटची तारीख असणार आहे. या राऊंडमध्ये झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्टइंडिज आणि आर्यलॅंड संघ सहभागी होणार आहे. याशिवाय नेपाल, ओमान, स्कॉटलॅंडस नेदरलॅंड्स आणि यूएईचा संघही क्वालिफिकेशन राऊंडचा भाग असणार आहे. ही टूर्नामेंट झिम्बाब्वेमध्ये खेळवण्यात येणार आहे.