WTC Final Australia Probable Playing 11 : भारताविरोधात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने त्या खेळाडूंबाबत सांगितलं आहे, जे भारताविरोधात फायनलमध्ये मैदानावर उतरु शकतात. कमिन्सने स्पष्ट केलं की, वेगवान गोलंदाज स्कॉट बोलॅंडला ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग ११ मध्ये समावेश करणार आहेत. तर मायकल नेसरला हेजलवुडच्या जागेवर टीममध्ये सामील केलं होतं. पण त्याला संधी मिळणार नाही. ७ जूनला लंडनच्या ओव्हल मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमिन्सने स्कॉट बोलॅंडचं नावाची पुष्टी करत सांगितलं की, भारताविरोधात होणाऱ्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. भारताविरोधात होणाऱ्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पाच फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन, विकेटकीपर एलेक्स कॅरी, तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत मैदानात उतरु शकतो.

ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेईंग ११

डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लियोन, स्कॉट बोलैंड

नक्की वाचा – कोण जिंकणार WTC फायनल? भारत-ऑस्ट्रेलियाबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूने केला दावा, म्हणाला, “टीम इंडियाला खूप कठीण..”

दुसरीकडे भारतीय प्लेईंग ११ मध्ये ईशान किशन आणि केएस भरत यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. इरफान पठाणने ट्वीट करत, भारतीय प्लेईंग इलेव्हनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. इरफानने स्वत: तयार केलेल्या प्लेईंग इलेव्हन मध्ये के एस भरतच्या जागेवर ईशान किशनचा समावेश केला आहे. तर आश्विन आणि शार्दूलबाबत गोंधळ आहे. इरफानचं म्हणणं आहे की, खेळपट्टी आणि हवामान पाहता, टीम मॅनेजमेंट शार्दूल आणि आश्विनपैकी एकाला प्लेईंग ११ मध्ये सामील करण्याबाबत विचार करू शकते. मागील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about team india and australia probable playing 11 for wtc final 2023 rohit sharma vs pat cummins ind vs aus nss
First published on: 06-06-2023 at 16:45 IST