भारताचा महान फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची अनेकदा चाहते तुलना करतात. मात्र, कोहली सध्या जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी बाबरला खूप मोठा पल्ला गाठावा लागेल, असे अनेक क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक यानेही कोहली आणि बाबर मोठे विधान केले आहे.

विराट कोहली आणि बाबर आझम यांची अनेकदा एकमेकांशी तुलना झाली आहे. कोहली बराच काळ त्याच्या खेळात शीर्षस्थानी आहे, तर बाबरने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दाखवून दिले आहे की तो भविष्यात एक महान फलंदाज बनू शकतो. या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. मात्र, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक याने बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान संघाला घरचा आहेर देत दोघांची तुलनाच होऊ शकत नाही असे म्हटले आहे.

हेही वाचा: Shikhar Dhavan: … जेव्हा शिखर धवनने १४-१५ व्यावर्षी केली होती HIV चाचणी, टीम इंडियाच्या गब्बरने केला मोठा खुलासा

एका मुलाखतीत रज्जाकने विराटचे वर्णन महान खेळाडू असे केले आहे. रज्जाकच्या मते, बाबरपेक्षा तो कोहलीचा फिटनेस चांगला आहे. रज्जाक म्हणाला, “विराट हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो त्याच्या संघाला सोबत घेऊन जातो. त्याचा हेतू नेहमीच सकारात्मक असतो. तो त्याच्या कौशल्याचा खूप चांगला वापर करतो. मुख्य म्हणजे त्याचा फिटनेस जागतिक दर्जाचा आहे. कोहलीच्या फिटनेसशी तुलना तर सोडाच तो त्याच्या आसपास देखील नाही अशा तिखट शब्दात नाराजी व्यक्त केली.”

पुढे बोलताना पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणाला, “बाबरला त्याच्या फिटनेसवर अधिक काम करण्याची गरज आहे. बाबर हा पाकिस्तानचा नंबर वन खेळाडू आहे. बाबर हा खरे तर जगातील नंबर १ फलंदाज व्हायला हवा. मग तो खेळाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये असो, कसोटी, एकदिवसीय किंवा टी२०, तो सातत्यपूर्ण कामगिरी करणारा असला पाहिजे. प्रत्येक देशाकडे विराटसारखा खेळाडू असतोच असे नाही. मात्र बाबरमध्ये ती होण्याची क्षमता आहे असे मला वाटते पण त्यासाठी मेहनतची आवश्यकता आहे. यात बाबर कमी पडत आहे, त्याने आळस झटकून कामाला लागयला हवे.”

हेही वाचा: Virat-Anushka: “दो ड्रिंक हो गये तो…”, विराटने आपल्या सवयीबाबत असा काही खुलासा केला की अनुष्काही झाली चकित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला, “आम्हाला त्यांची तुलना करण्याची गरज नाही. हे म्हणजे असे  विचारण्यासारखे झाले आहे की कपिल देव किंवा इम्रान खान कोण चांगले? ही तुलना योग्य नाही. कोहली हा भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे. बाबर हा पाकिस्तानचा चांगला खेळाडू आहे. कोहली हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, बाबरही थोडा वेळ लागेल. पण कोहलीचा फिटनेस बाबरपेक्षा खूपच चांगला आहे.”