Kuldeep Yadav Future Wife: भारतीय क्रिकेट संघाचा सध्याच्या घडीला उत्कृष्ट फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला कुलदीप यादव आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कुलदीपने आज म्हणजेच ४ जून रोजी आपल्या बालपणीच्या मैत्रिणीबरोबर साखरपुडा केला आहे. लखनौमध्ये एका खाजगी समारंभात साखरपुडा उरकला. कुलदीप यादवची होणारी पत्नी नेमकी कोण आहे, जाणून घ्या.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या स्टार स्पिनरने गुपचूप साखरपुडा केला. साखरपुडा समारंभ खाजगी ठेवण्यात आला. भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि वंशिका यांचा साखरपुडा समारंभ लखनौमध्ये आयोजित एका समारंभात पार पडला.

वंशिका ही मूळची कानपूरमधील श्याम नगरची आहे आणि ती एलआयसीमध्ये नोकरी करते. वंशिका आणि कुलदीप यादव हे बालपणीचे मित्र आहेत. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता दोघांचा साखरपुडा पार पडला आहे. रिंकू सिंगसह अनेक क्रिकेटपटू कुलदीपच्या साखरपुड्याला उपस्थित राहिले आहेत.

कोण आहे कुलदीप यादवची होणारी पत्नी?

कुलदीप यादवच्या होणाऱ्या पत्नीचं नाव वंशिका आहे. वंशिका ही मूळची कानपूरची आहे. कुलदीप यादवची पत्नी एलआयसीमध्ये काम करते. ती कुलदीपची बालपणीची मैत्रिण आहे. कुलदीपच्या साखरपुड्याचे फोटो त्याने अद्याप शेअर केलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड दौऱ्यापूर्वी कुलदीप यादवचा साखरपुडा झाला. इंग्लंडच्या भूमीवर होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तो टीम इंडियाचा भाग आहे. कुलदीप सध्या आयपीएल २०२५ मध्ये खेळत होता आणि दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. या लीगमध्ये त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पण कुलदीपने चांगली कामगिरी केली होती.