मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी झालेल्या बहरिन ग्रां. प्रि. शर्यतीत १ तास ३५ मिनिटे ५ सेकंदांची वेळ नोंदवून सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. फेरारीने पुन्हा कडवी टक्कर देत मर्सिडीजचा घाम काढला. यावेळी फेरारीच्या सेबॅस्टियन वेटेलला करिष्मा दाखवण्यात अपयश आले असले तरी त्याचा संघ सहकारी किम रैकोनेनने सर्वाना आश्चर्याचा धक्का देत दुसरे स्थान पटकावले. अखेरच्या टप्प्यामध्ये रैकोनेनने गती वाढवत रोसबर्गला पिछाडीवर टाकून तिसऱ्या स्थानावर समाधान मानण्यास भाग पाडले. रैकोनेन याने (१:३६:३११) सर्वाद जलद वेळही नोंदवली. विलियम मर्सिडीजच्या वॉल्टेरी बोट्टासने चौथे, तर वेटेलने पाचवे स्थान पटकावले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2015 रोजी प्रकाशित
हॅमिल्टनराज; पण रैकोनेनचा धक्का
मर्सिडीजच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी झालेल्या बहरिन ग्रां. प्रि. शर्यतीत १ तास ३५ मिनिटे ५ सेकंदांची वेळ नोंदवून सलग दुसऱ्यांदा बाजी मारली.
First published on: 20-04-2015 at 02:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lewis hamilton wins the bahrain gp